शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:38 IST

‘तिहेरी तलाक’ पद्धतीला अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये बंदी आहे किंवा त्यात बदल तरी करण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला की लगेच धार्मिक व सामाजिक मुद्दे उपस्थित करून त्याला विरोध होतो. परंतु आता महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेकण्याची वेळ आली आहे व त्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुस्लिम महिला आंदोलनकर्त्या शायरा बानो यांनी केले.

ठळक मुद्देशायरा बानो : ‘भारतीय स्त्री शक्ती’ अधिवेशनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘तिहेरी तलाक’ पद्धतीला अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये बंदी आहे किंवा त्यात बदल तरी करण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला की लगेच धार्मिक व सामाजिक मुद्दे उपस्थित करून त्याला विरोध होतो. परंतु आता महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेकण्याची वेळ आली आहे व त्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुस्लिम महिला आंदोलनकर्त्या शायरा बानो यांनी केले. भारतीय स्त्रीशक्तीतर्फे नागपुरात २७ जानेवारीपासून दोन दिवसीय त्रिदशकपूर्ती राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या अधिवेशनाला राज्यसभा खासदार संपतिया उईके, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, महापौर नंदा जिचकार, अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष कांचन गडकरी, आरोग्यतज्ज्ञ डॉ.प्रभा चंद्रा, स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयश्री के.एस., सचिव कुमुदिनी भार्गव, अधिवेशन प्रमुख हर्षदा पुरेकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या.‘तिहेरी तलाक’ हा महिलांचे शोषण करणाराच प्रकार होता. अशा अनेक कुप्रथा समाजात अस्तित्वात आहे. मुळात ‘तलाक’चा अधिकार पुरुषांनाच का, असा प्रश्न यावेळी बानो यांनी उपस्थित केला. महिलांच्या मौलिक अधिकारांचे संवर्धन व्हायला हवे. ‘तिहेरी तलाक’ पद्धती हद्दपार केल्याबाबत केंद्र सरकारचे मुस्लिम महिलांनी आभारच मानायला हवे, असे बानो म्हणाल्या. अनेक वर्षांपासून पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांचे दमन झाले. मात्र आता त्यांना आरक्षणामुळे नेतृत्वाची संधी मिळाली आहे. या संधींचा उपयोग करण्यासाठी आपण तयार आहोत का, याचे महिलांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. राजकीय क्षेत्रातील महिलांना तर आणखी तयारीची आवश्यकता आहे. अनेक महिला शिकतात. मात्र शिक्षणाचा त्या योग्य उपयोग करतीलच असे नाही. महिला पूर्णपणे स्वावलंबी झाल्या नसल्याचे चित्र आहे, असे प्रतिपादन नंदा जिचकार यांनी केले.यावेळी डॉ. प्रभा चंद्रा यांचा ‘वाटी’ राष्ट्रीय पुरस्कार व सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला. स्त्री शक्तीच्यावतीने काढण्यात आलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. अधिवेशनाला देशभरातून १२०० हून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. कुमुदिनी भार्गव यांनी प्रास्ताविक केले. रागिणी चंद्रात्रे यांनी संचालन केले तर हर्षा पुरेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर