शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रहारींनी सादर केले युद्धजन्य स्थितीचे अवलोकन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:58 IST

‘कारगिल विजय दिवसा’च्या पूर्वसंध्येला प्रहार मिलिटरी स्कूलच्यावतीने युद्धभूमीमध्ये बलिदान दिलेल्या सैनिकांच्या प्रति समर्पित भाव व्यक्त करत, युद्धजन्य स्थितीचे अवलोकन करणारे सादरीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देकारगिल विजय दिनाच्या पूर्वसंध्येला आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कारगिल विजय दिवसा’च्या पूर्वसंध्येला प्रहार मिलिटरी स्कूलच्यावतीने युद्धभूमीमध्ये बलिदान दिलेल्या सैनिकांच्या प्रति समर्पित भाव व्यक्त करत, युद्धजन्य स्थितीचे अवलोकन करणारे सादरीकरण करण्यात आले.यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल युद्ध लढलेले योद्धा लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर उपस्थित होते. त्यांनी १८ हजार फूट उंचीवर शून्य डिग्रीपेक्षाही कमी तापमानात अडीच-तीन महिने सलग कर्तव्य निभावणाऱ्या अनुभवाचे कथन केले. सोबतच, युद्धात धारातीर्थी पडणाऱ्या जवानांची वीरगाथा ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. प्रहार मिलिटरी स्कूलच्या रविनगर येथील अण्णासाहेब गोखले सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या बॅण्ड पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. भारतमातेच्या पुजनाने आणि अमर जवान स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी, प्रहारचे संस्थापक स्व. कर्नल सुनील देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी कारगिल युद्धात वीरगतीला प्राप्त झालेले वीर कॅप्टन किशिंग नानगृन, कॅप्टन विजयंत थापर, कॅप्टन हनिफुद्दीन, रायफल मॅन संजय कुमार यांनी दाखवलेल्या युद्धकौशल्याचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्लाईट लेफ्टनंट शिवानी देशपांडे यांनी करवून दिले. संचालन तपस्सू मेश्राम यांनी केले. आभार मुख्याध्यापिका शुभा मोहगांवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनसाठी शर्मिष्ठा नाग, शितल बागेश्वर, सतीश मोरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी, प्रहार समाज जागृती संस्थेच्या अध्यक्षा शमा देशपांडे, सीपी अ‍ॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मेजर जनरल देव, सचिव अनिल महाजन, मेजर जनरल अनिल बाम, रेखा पांडे उपस्थित होते.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनnagpurनागपूर