शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्लास्टिकबंदीत दीड लाखांवर दंडवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 21:42 IST

राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू करताच नागपुरात शनिवारपासून याची अंमलबजावणी करण्यात आली. महापालिकेने शनिवारी सकाळपासून प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबविली. दहाही झोनमध्ये नेमलेल्या पथकांनी धडक कारवाई करीत ५३८.९ किलो प्लास्टिक जप्त केले. एकूण १ लाख ५५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. ३४ जणांना नोटीस बजावण्यात आली. कारवाई दरम्यान विक्रेत्यांनी पथकाला जबर विरोधही केला.

ठळक मुद्दे५३८ किलो प्लास्टिक जप्त : ३४ जणांना नोटीस : एकावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू करताच नागपुरात शनिवारपासून याची अंमलबजावणी करण्यात आली. महापालिकेने शनिवारी सकाळपासून प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबविली. दहाही झोनमध्ये नेमलेल्या पथकांनी धडक कारवाई करीत ५३८.९ किलो प्लास्टिक जप्त केले. एकूण १ लाख ५५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. ३४ जणांना नोटीस बजावण्यात आली. कारवाई दरम्यान विक्रेत्यांनी पथकाला जबर विरोधही केला. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत एका दुकानदाराने पथकाशी वाद घातला. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.प्लास्टिकबंदीच्या घोषणेनंतर अंमलबजावणीच्या नियोजनासाठी महापालिकेने शुक्रवारीच अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्याअध्य़क्षतेखाली आढावा बैठक घेतली होती. तपासणी करून कारवाई करण्यासाठी प्रत्येक झोनसाठी एक असे एकूण १० पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार पथकांनी शनिवारी सकाळपासून दुकानांमध्ये विक्री तसेच वापरण्यात येत असलेले प्लास्टिक शोधण्यास सुरुवात केली. कारवाई होणार या धास्तीने बहुतांश प्लास्टिक विक्रेत्यांनी दुकाने उघडलीच नसल्याचे आढळून आले. धरमपेठ झोन क्र. २ मध्ये १५० किलो प्लास्टिक जप्ती, सहा नोटीस आणि १० हजार दंड वसुली, हनुमाननगर झोन क्र. ३ मध्ये ३२ किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि २३ हजार ५०० रुपयांची दंड वसुली, धंतोली झोन क्र. ४ मध्ये ५० किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि २५ हजारांची दंडवसुली, नेहरूनगर झोन क्र. ५ मध्ये ४३ किलो प्लास्टिक जप्ती आणि २५ हजारांची दंड वसुली करण्यात आली. या झोनमध्ये एकही नोटीस देण्यात आली नाही. गांधीबाग झोन क्र. ६ मध्ये १३६ किलो प्लास्टिक जप्ती, पाच नोटीस आणि दहा हजारांची दंड वसुली, सतरंजीपुरा झोन क्र. ७ मध्ये ६.२०० किलो प्लास्टिक जप्ती, एक नोटीस आणि पाच हजार रुपयांची दंड वसुली, लकडगंज झोन क्र. ८ मध्ये २१.७०० किलो प्लास्टिक जप्ती, दोन नोटीस आणि १० हजार रुपयांचा दंड, आसीनगर झोन क्र. ९ मध्ये १८ किलो प्लास्टिक जप्ती, तीन नोटीस आणि १५ हजारांचा दंड तर मंगळवारी झोन क्र. १० मध्ये ८२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. सात नोटीस बजावण्यात आल्या आणि ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.दुकानदारांचा तीव्र विरोध महापालिकेच्या १० पथकांनी शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन प्लास्टिकचा वापर व विक्री होत आहे का याची पाहणी करून दंडात्मक कारवाई केली. पथकाला बऱ्याच ठिकाणी दुकानदारांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. हजारो रुपयांचे प्लास्टिक आम्ही खरेदी केले आहे, ते कसे फेकून द्यायचे, याची नुकसान भरपाई सरकार देणार का, असे प्रश्न दुकानदारांनी पथकाला केले. काही दुकानदारांनी तर पथकावरच लाच घेण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे आरोप केले. कारवाईमुळे दुकानदारांमध्ये अस्वस्थता पसरली असून या विरोधात दुकानदार व विक्रेते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.धरमपेठ व मंगळवारी झोनची धडक कारवाईसर्वाधिक १५० किलो प्लास्टिकची जप्ती धरमपेठ झोन क्र. २ मध्ये करण्यात आली तर सर्वाधिक ३२ हजारांचा दंड मंगळवारी झोन क्र. १० मधून वसूल करण्यात आला. लक्ष्मीनगर झोन क्र. १ मध्ये एक नोटीस देण्यात आला नाही किंवा दंड वसुली झाली नाही.प्लास्टिकबंदीसाठी पुढाकार घ्या नागपूर शहरात आज, शनिवारपासून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. प्लास्टिक बाळगल्यास ५ पासून २५ हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर बंद करा. याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा. वीरेंद्र सिंह, मनपा आयुक्तनियमित तपासणी होणार महापालिकेच्या पथकांनी शासन आणि प्रशासनाच्या दिशानिर्देशानुसार अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक वस्तूंवर बंदी आहे अशा प्लास्टिक विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली. पथकाद्वारे नियमित तपासणी सुरू राहील व प्लास्टिक आढळून आल्यास कारवाई केली जाईल. डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीnagpurनागपूर