नागपुरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST2021-02-15T04:09:06+5:302021-02-15T04:09:06+5:30

लाोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. रविवारी तपासण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी ...

Over 4,000 active corona patients in Nagpur | नागपुरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर

नागपुरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर

लाोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. रविवारी तपासण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी १३.६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. शनिवारी हे प्रमाण १०.२९ टक्के इतके होते. रविवारी जिल्ह्यात ४५५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर सहाजणांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने फेब्रुवारी महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्यांदा ४ हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे.

नागपुरात रविवारी ३३३७ नमुने तपासण्यात आले. यातील ४५५ नमुने पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ४२५, ग्रामीणचे २८ व जिल्ह्याबाहेरचे दाेनजण आहेत. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणचा १ व जिल्ह्याबाहेरचे ३ जण आहेत. रविवारी २५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १,३०,४७८ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी रिकव्हरी रेट ९४.०३ टक्के इतका होता. आतापर्यंत १,३८,७५५ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत, तर ४२३० जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ४०४७ वर पोहोचली आहे. यात शहरातील ३२८६ आणि ग्रामीणचे ७६१ रुग्ण आहेत. रविवारी तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये शहरातील २९१९ आणि ग्रामीणचे ४१८ रुग्ण आहेत. आतापर्यंत ११ लाख २२ हजार १६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

बाॅक्स

५ दिवसांत वाढले ९०५ सक्रिय रुग्ण

नागपूर जिल्ह्यात ९ फेब्रुवारी रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ३१४२ होती. त्यावेळी रिकव्हरी रेट ९४.६२ टक्के होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे १४ फेब्रुवारी रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ४०४७ वर पोहोचली आहे. यातून हे स्पष्ट दिसून येते की, ५ दिवसांत ९०५ सक्रिय रुग्ण वाढले. १ फेब्रुवारी रोजी ३२५५, २ फेब्रुवारी रोजी ३१४६, ४ फेब्रुवारी रोजी ३१३२ सक्रिय रुग्ण नागपुरात होते.

ॲक्टिव - ४०४७

बरे झालेले - १,३०,४७८

मृत - ४२३०

Web Title: Over 4,000 active corona patients in Nagpur