शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नागपूर जिल्ह्यातील उदासा येथे कौटुंबिक कलहातून जबर हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:05 IST

मुलगी नांदण्याच्या मुद्यावरून उफाळलेला कलह टोकास गेला आणि त्यातून दोन्ही कुटुंबे समोरासमोर आली. एवढेच नव्हे तर, त्यांनी तलवार आणि लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला चढविला. त्यात १८ जण जखमी झाले असून, त्यातील नऊ जणांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. शिवाय, एकूण ३२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदासा (नाथजोगी वस्ती) येथे सोमवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे१८ जखमी, ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलगी नांदण्याच्या मुद्यावरून उफाळलेला कलह टोकास गेला आणि त्यातून दोन्ही कुटुंबे समोरासमोर आली. एवढेच नव्हे तर, त्यांनी तलवार आणि लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला चढविला. त्यात १८ जण जखमी झाले असून, त्यातील नऊ जणांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. शिवाय, एकूण ३२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदासा (नाथजोगी वस्ती) येथे सोमवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.उदासा हे गाव उमरेडपासून नऊ कि.मी.वर आहे. येथील नाथजोगी वस्तीत वास्तव्याला असलेले राजेश्वर मांडवकर यांची मुलगी सोनी हिचा विवाह सुरेश तांबू याच्याशी झाला. सुरेश तांबू याची बहीण रामबाई हिचे लग्न रवी मांडवकर याच्याशी झाले. साधारणत: तीन वर्षापूर्वी हा विवाह पार पडला. कालांतराने दोन्ही परिवारात कलहाची ठिणगी पडली. त्यातच मुलींच्या नांदण्यावरून वारंवार खटके उडायला सुरुवात झाली. परिणामी, दोन्ही मुली आपआपल्या माहेरी परतल्याची माहिती जाणकारांनी दिली.याच कारणावरून तांबू आणि मांडवकर कुटुंबात वाद उद्भवत गेले आणि त्यांच्यातील तक्रारी अनेकदा पोलीस ठाण्यात पोहोचत गेल्या. याला खुद्द पोलिसांनीही दुजोरा दिला. दरम्यान, सोमवारी सकाळी या दोन्ही कुटुंबांमध्ये पुन्हा एकदा कलहाचा भडका उडाला. दोन्ही कुटुंबातील सदस्य हातात तलवार व लाठ्याकाठ्या घेऊन समोरासमोर आले. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याने १८ जण जखमी झाले. दरम्यान, उमरेड पोलिसांनी गणपती तांबू यांच्या तक्रारीवरून मोहनलाल मांडवकर आणि इतर १४ जणांविरुद्ध तसेच राजेंद्र मांडवकर यांच्या तक्रारीवरून १८ जणांविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ४५२, ४२७, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले.जखमींची नावेया घटनेत मोहनलाल राजेश्वर तांबू (३०), सोनी अनिल तांबू (२०), नीलीबाई लक्षपती बाबर (३५), अनिल राजेश्वर तांबू (२६), बसंती गुड्डू तांबू (३४), रोशन गुड्डू तांबू (१७), सुनील राजेश्वर तांबू (२३), बासेतू गुड्डू तांबू (४०), धरमनाथ परदेसी मांडवकर (३७) हे नऊ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. शिवाय, सुरेश राजेश्वर तांबू (२६), रवी राजेश्वर तांबू (२८), रमेश मोहनलाल मांडवकर, राजेश्वर बाप्पा मांडवकर (४५), गोदरीबाई गजानन चव्हाण (६०), जिजेस मोहनलाल मांडवकर (२२), राजेंद्र भाजीनाथ मांडवकर (२७), मोहनलाल जांबा मांडवकर (६७), रवी राजेश्वर मांडवकर (२३) या जखमींवर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालय व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.गावाला छावणीचे स्वरूपया घटनेमुळे गावात व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तणावाची परिस्थिती आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली होती. गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, आरोपींकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या लाठ्याकाठ्या जप्त करण्यात आल्या आहे. यात तलवारीचा वापर झाला की नाही, या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती उमरेडचे ठाणेदार प्रकाश हाके यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर