शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शाळाबाहेरची शाळा’ : विभागीय आयुक्तांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 21:10 IST

कोरोनामुळे शाळा बंद आहे. घरात बसून मुले कंटाळलेली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात सातत्य ठेवण्यासाठी, कंटाळलेल्या वेळेत मनोरंजनात्मक शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे म्हणून नागपूर विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘शाळाबाहेरची शाळा’ हा उपक्रम राबविला आहे.

ठळक मुद्देमंगळवार व शुक्रवारी आकाशवाणीवरून प्रक्षेपण

 

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे शाळा बंद आहे. घरात बसून मुले कंटाळलेली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात सातत्य ठेवण्यासाठी, कंटाळलेल्या वेळेत मनोरंजनात्मक शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे म्हणून नागपूर विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘शाळाबाहेरची शाळा’ हा उपक्रम राबविला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शाळा बंद असून, विद्यार्थ्यांचे शिक्षणही प्रभावित होत आहे. या मुलांना दूरस्थ शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नातून हा एक नावीन्यपूर्ण रेडिओ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ‘अध्ययन निष्पत्ती’ आधारित मूलभूत क्षमता विकास कार्यक्रमाची जोड देण्यात आली आहे. आकाशवाणी नागपूरच्या ‘अ’ केंद्रावरून शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी १०.३५ वाजता प्रक्षेपित केला जात आहे. पालकांना मुलांचा अभ्यास घेणे सोपे जावे म्हणून त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप किंवा एसएमएसद्वारे कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी अभ्यासमाला पाठविण्यात येत आहे. सर्व अभ्यासमाला या ‘करूया थोडा अभ्यास आणि थोडी मस्ती’ या तत्त्वावर आधारित असून, नजीकच्या काळात यात शालेय पाठ्यपुस्तकातील घटकांचासुद्धा समावेश करण्यात येईल. पालकांना अभ्यासमाला पाठविण्यासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक संग्रहित करण्यात आले आहेत. गावातील पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप गट तयार केले असून, त्या गटावर अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांच्या मदतीने अभ्यासमाला पाठविली जात आहे. या अभ्यासमालेत दोन गट तयार करण्यात आले आहेत. कार्यक्रमाची माहिती गावातील पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत गावात दवंडी देऊन पालकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अल्पावधीतच कार्यक्रमाला मुले व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर विभागातील जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यभरातील अनेक जिल्ह्यांतून हा कार्यक्रम ऐकला जात असून, अभ्यासमालेसाठीसुद्धा मागणी होत आहे. राज्य शालेय शिक्षण विभाग व प्रथम संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे.

लाऊडस्पीकरच्या माध्यमातूनही प्रसारणरेडिओ संच उपलब्ध नसल्यास हा कार्यक्रम ऐकण्यापासून पालक आणि मुले वंचित राहू नये यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना कार्यक्रम लाऊडस्पीकरच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी