शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमचा स्मार्टफोन शासकीय नाही : ग्रामसेवक झाले ग्रुपवरून लेफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 18:54 IST

शिक्षकांच्यानंतर आता ग्रामसेवकांनीही शासकीय कामासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याला विरोध केला आहे. राज्यातील सर्व ग्रामसेवक ३१ डिसेंबरच्या रात्री गटविकास अधिकारी अ‍ॅडमिन असलेल्या ग्रुपवरून लेफ्ट झाले आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय कामावर परिणाम

आॅनलाईन लोकमतनागपूर : शिक्षकांच्यानंतर आता ग्रामसेवकांनीही शासकीय कामासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याला विरोध केला आहे. राज्यातील सर्व ग्रामसेवक ३१ डिसेंबरच्या रात्री गटविकास अधिकारी अ‍ॅडमिन असलेल्या ग्रुपवरून लेफ्ट झाले आहे. आमचा स्मार्टफोन शासकीय कामासाठी का वापरावा, असा सवाल ग्रामसेवकांनी केला आहे. त्याचा परिणाम आता प्रशासकीय कामावर होणार असल्याने, अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.ग्रामपंचायतीच्या लेखाजोख्यापासून गावाच्या स्वच्छेतपर्यंतची जबाबदारी पेलणारा प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक असतो. हा ग्रामसेवक पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी याच्या मार्गदर्शनात काम करतो. शासनाच्या सर्व योजना ग्रामसेवकाच्या माध्यमातून गावात राबविण्यात येतात. लोकप्रतिनिधींशी सातत्याने संपर्कात असणे, वीज, पाणी, लाईट या सोईसुविधा गावकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची त्याच्यावर जबाबदारी असते. ग्रामसेवकाला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून बांधून ठेवले होते. व्हॉट्सअ‍ॅपवरच सूचना, पत्र, जीआर, योजनांची माहिती, बैठका आदींच्या सूचना व महिती देण्यात येत होती. व्हॉट्सअ‍ॅपकडे दुर्लक्ष झाल्यास, अधिकाऱ्यांकडून टार्गेट करण्यात येत होते. जिल्हा आणि तालुका पातळीवरील अधिकारी रात्री-बेरात्री आदेश पाठवून, कधीही आणि ताबडतोब माहिती मागविण्याचे प्रकार वाढले होते. स्वत:चा फोन आणि इंटरनेटचा खर्च स्वत:च्या खिशातून करणारे ग्रामसेवक या प्रकारामुळे संतापले होते. व्हॉट्सअ‍ॅपचा अतिरेक वाढल्यामुळे राज्यपातळीवरील ग्रामसेवक संघटनांनी सर्व ग्रुपवरून लेफ्ट होण्याचा निर्णय घेतला. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ग्रामसेवक सर्व ग्रुपमधून लेफ्ट झाले. ग्रामपंचायतीपर्यंत शासकीय यंत्रणा आहे. ग्रामपंचायतीला नेट सुविधा आहे. आॅपरेटरसुद्धा आहे. त्यामुळे शासकीय कामे यंत्रणेमार्फत आम्हाला यायला हवी. पण अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून अतिरेक केला होता. त्यामुळे हा निर्णय घेतला. याचा परिणाम निश्चितच कामावर होणार आहे. आजचा पहिला दिवस आहे. आठवड्याभरात त्याचे परिणाम कामकाजावर नक्कीच जाणवतील.मीनाक्षी बन्सोड, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना (डीएनए१३६) ग्रामसेवकांची मनमानीमुळात ग्रामसेवकांचा निर्णय हा चुकीचा आहे. व्हाटसअ‍ॅप ग्रुपमुळे कामाचा वेग वाढला होता. गावाची आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध होत होती. थोडाफार अतिरेक होतही असेल, परंतु एवढी डोकेदुखी नव्हती. आपण शासनाचे कर्मचारी आहोत. आपल्याला मिळालेल्या जबाबदारीनुसार शासन वेतनाच्या रूपात मोबदला देते. त्यासाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप वापरल्यास काय चुकीचे आहे, असे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपgram panchayatग्राम पंचायत