शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमचा जाहीरनामा; एकात्मिक बालविकास प्रकल्प सक्षम करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:37 IST

देशात एकात्मिक बाल विकास योजनेचे ७६०६७ प्रकल्प कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत १३ लाख ४२ हजार १४५ अंगणवाड्यात २४ लाख ५६ हजार सेविका व मदतनिस काम करीत आहे. ही योजना बळकट करणे गरजेचे आहे असे मत अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुकर भरणे यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात एकात्मिक बाल विकास योजनेचे ७६०६७ प्रकल्प कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत १३ लाख ४२ हजार १४५ अंगणवाड्यात २४ लाख ५६ हजार सेविका व मदतनिस काम करीत आहे. ही योजना बळकट करणे गरजेचे आहे असे मत अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुकर भरणे यांनी व्यक्त केले आहे.देशात इंदिरा गांधी यांचे सरकार असताना एकात्मिक बाल विकास योजना अमलात आली. ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्य रेषेखाली असलेले कुटुंब, कुपोषित मुले, गरोदर माता, स्तनदा माता, गोरगरीब शेतमजूर, आर्थिक कमकुवत घटकासाठी होती. सुरुवातीला योजनेसाठी बजेटमध्ये भरपूर तरतूद होत होती. आदिवासी भागात, शहरी झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंंबाना त्याचे आकर्षण होते. सधन वर्गातील लोकही योजनेंतर्गत चालणाऱ्या अंगणवाड्यात मुले पाठवित होते. परंतु गेल्या काही वर्षात एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची दुर्दशा होत आहे. सरकारच्या बजेटमधून अपेक्षित तरतूद होत नाही. मुलांना पोषण आहार मिळणे बंद झाले आहे. सेविका व मदतनीसांना ४-४ महिने मानधन मिळत नाही. योजनांवर वेगवेगळ्या अटी लावण्यात येत आहे. पटसंखेच्या आधारावर समायोजन, वयाची अट, मेडिकल फिटनेस, ३ अपत्य असल्यास बडतर्फ, भरती, पदोन्नतीवर बंदी, अंगणवाडी सुधारणेकडे दुर्लक्ष झाले आहे. अंगणवाडीत काम करणाºया ४० टक्के महिला विधवा, घटस्फोटित, निराश्रित आहेत. सरकारच्या धोरणांमुळे अंगणवाड्या बंद पडत आहे. अंगणवाडीत शिक्षणाकरिता साहित्य, सकस पोषण आहार, सेविका व मदतनिसांना १८००० रुपये मानधन मिळणे गरजेचे आहे.

टॅग्स :Socialसामाजिक