शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा गोवारी बांधव अन्नत्याग व देहत्याग करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:41 IST

११४ गोवारी बांधवांच्या शहीद स्मृतीला २४ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ज्यासाठी या बांधवांचे बळी गेले तो न्याय समाजबांधवांना अद्याप मिळाला नाही. नुकताच १४ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा निर्वाळा दिला. मात्र राज्य शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करून न्याय द्यावा, अन्यथा गोवारी बांधव अन्नत्याग व देहत्याग करतील, असा इशारा आदिवासी गोवारी समन्वय समितीने दिला आहे.

ठळक मुद्देसमन्वय समितीचा इशारा : न्यायालयीन निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : ११४ गोवारी बांधवांच्या शहीद स्मृतीला २४ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ज्यासाठी या बांधवांचे बळी गेले तो न्यायसमाजबांधवांना अद्याप मिळाला नाही. नुकताच १४ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा निर्वाळा दिला. मात्र राज्य शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करून न्याय द्यावा, अन्यथा गोवारी बांधव अन्नत्याग व देहत्याग करतील, असा इशारा आदिवासी गोवारी समन्वय समितीने दिला आहे.समितीचे समन्वयक शालिक नेवारे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत याबाबत आपली भूमिका मांडली. येत्या २३ नोव्हेंबर रोजी ११४ गोवारी शहीद बांधवांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोवारी शहीद स्मारक, झीरो माईल परिसरात श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे. यावर्षी राज्यभरातून एक लाखापेक्षा अधिक गोवारी बांधव शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोळा होतील, असा विश्वास नेवारे यांनी व्यक्त केला. १९९४ ला हक्काच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चात ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यानंतरही राज्यात युतीचे सरकार आले. मात्र कोणत्याही सरकारने समाजाला न्याय दिला नाही, अशी टीका नेवारे यांनी केली. नुकताच उच्च न्यायालयाने गोवारी आदिवासी असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाला आता तीन महिने लोटूनही शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही. शासनाने १५ डिसेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करून न्याय दिला नाही तर त्यापुढे अन्नत्याग आंदोलन सुरू करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पत्रपरिषदेत मारोतराव वाघाडे, देविदास बासकवरे, मंगेश नेवारे, झिबल वाघाडे, रुपेश रारूत, निरुपाल राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर