शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू ! नागपुरातील धमकीपत्राने सुरक्षा यंत्रणेत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:02 IST

आमच्याकडे शार्पशूटर आणि हल्लेखोरांची फौज आहे. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज द्या तसेच खुल्या प्रवर्गातील तरुणांना नोकरी द्या, अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी लिहिलेली पत्रके अमरावती मार्गावरील कॅम्पससमोरील बसथांब्यावर सोमवारी सकाळी लावलेली आढळली. यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देआमच्याकडे शार्पशूटर व हल्लेखोरांची फौज आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमच्याकडे शार्पशूटर आणि हल्लेखोरांची फौज आहे. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज द्या तसेच खुल्या प्रवर्गातील तरुणांना नोकरी द्या, अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी लिहिलेली पत्रके अमरावती मार्गावरील कॅम्पससमोरील बसथांब्यावर सोमवारी सकाळी लावलेली आढळली. यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.कॅम्पससमोर असलेल्या बसस्थांब्यावर आजूबाजूला तीन पत्रके चिकटवली होती. सोमवारी सकाळी एका सजग प्रवाशाच्या ते निर्दशनास आले. त्याने आजूबाजूच्यांना आणि पोलिसांना सूचना दिली. त्यानुसार, अंबाझरी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. गुन्हे शाखेचे पथकही पोहचले. तोपर्यंत तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी ती पत्रके ताब्यात घेतली.‘विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज द्या, खुल्या प्रवर्गातील तरुणांना नोकरी द्या, शासकीय कर्मचाऱ्यांनो आळस सोडून काम करा, आरक्षण सर्वांना संपवेल.’ असे या पत्रकात लिहिलेले आहे. हा इशारा गांभीर्याने घेतला नाही तर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात येईल. आमच्याकडे शार्पशूटर व हल्लेखोरांची फौज आहे. यमराज की उंगली रिमोट पर है,’ असा धमकीवजा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे. पोलिसांनी ती पत्रके जप्त केली असून बसथांब्यावर ही पत्रके कुणी लावली, त्याचा शोध घेण्यात येत आहे. या संबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता एखाद्या विद्यार्थ्याने किंवा बेरोजगार तरुणाने ही पत्रके लावली असावी, असा अंदाज त्यांनी ऑफ द रेकॉर्ड व्यक्त केला. या संबंधाने चौकशी सुरू असून ही धमकी पत्रके लावणाऱ्याला लवकरच आम्ही अटक करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.एटीएसचे पथकही पोहचलेबॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीची पत्रके मिळाल्याचे कळताच येथील दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ही सतर्क झाले आहे. अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या पत्रकांबाबत माहिती घेतली. बसथांब्याची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेण्यात आले. आजूबाजूच्या हातठेलेवाले, दुकानदार यांच्याकडेही चौकशी केली. ही पत्रके बस थांब्यावर कुणी लावली, त्याचा पोलिसांसोबत एटीएसचे पथकही समांतर तपास करीत आहे.

टॅग्स :Bombsस्फोटकेuniversityविद्यापीठ