शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

"ओरिजनल शिवसेना म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढवू, मुंबई मनपावर भगवा फडकवू"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2022 6:27 PM

महाराष्ट्र भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती आहे, असे फडणवीस म्हणाले.

नागपूर : मुंबई महापालिका निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कुठलीही निवडणूक लढत असताना ती आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे असा विचार करुन तुम्ही स्वत:ला झोकून देता तेव्हाच आपल्याला ती निवडणूक जिंकता येते. हे केवळ एकट्या मुंबई महानगरपालिकेसंदर्भात नव्हतं तर एकूणच निवडणुकीच्या नियोजनाबद्दल होतं, असं फडणवीस म्हणाले. आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केले.

मनसे, शिंदे गट आणि भाजप मुंबईत एकत्र निवडणूक लढणार अशा चर्चा सुरू आहेत, असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता फडणवीस म्हणाले, तुमची पतंगबाजी पाहतो. त्यावेळी मलादेखील मजा येते. ज्याला जे मनात येईल तो ते दाखवितो. ज्याला जे मनात येईल, तस आराखडे बांधतो. ते म्हणाले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ''मी स्पष्टपणे सांगतो की, भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजेच शिंदे गट, आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू''.

भाजप प्रदेशाध्यक्ष बारामती दौऱ्यावर आहेत, याबाबत बोलताना भाजपचं मिशन इंडिया आहे. महाराष्ट्र भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती आहे, असे फडणवीस म्हणाले. यासह, लास्ट फ्रंटीयर वगैरे काही नसतं. आमच्यासाठी राज्यातील प्रत्येक जागा महत्वाची आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं. 

शासकीय कार्यालय आदेशाने चालतात 

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे सगळ्यांच्याच मनात आहेत. परंतु, सरकारी कार्यालयं ही नियमांनी चालतात, आदेशानी चालतात. त्यामुळे अशाप्रकारचे आदेश बरेचवेळा काढले जातात. यामुळं फोटोसाठी निर्णय घेण्यात आला. राज्यातच नव्हे तर देशात फुले दाम्पत्याचा मान मोठा आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेMunicipal Election 2022महानगरपालिका निवडणुक 2022