शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारीत आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरच्या संत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारी २०१९ मध्ये आयोजन ...

ठळक मुद्देलोकमतचा पुढाकार : आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ येणार : पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या संत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारी २०१९ मध्ये आयोजन करण्यात येणार आहे. लोकमत समूहाच्या पुढाकाराने मागील वर्षीपासून सुरू केलेल्या या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भक्कम पाठिंब्याने विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समृद्धीत भर घालणाऱ्या या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात एक बैठक घेतली. बैठकीला महापौर, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.राज्यात विभागनिहाय प्रमुख सहा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून या अंतर्गत नागपूर येथे जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन येत्या १८ ते २१ जानेवारीदरम्यान सुरेश भट सभागृहात करण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन होत असल्यामुळे महोत्सवाचा लाभ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. या महोत्सवात विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. तसेच देशाच्या विविध भागातील संत्रा उत्पादक संस्था व प्रक्रिया उद्योगांचे प्रतिनिधींना सुद्धा महोत्सवात निमंत्रित करण्यात आले आहे. संत्र्याचे ब्रॅण्डिंग आणि प्रमोशन करणे हा महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करणे, तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनासोबतच विक्री, व्यवस्थापनाची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान देण्यासाठी शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून कृषी विभागामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. संत्रा महोत्सवाच्या आयोजनासाठी सर्व विभागांचा समन्वय राहावा यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी व आयोजनासाठी महानगरपालिकेसह सर्व विभागांनी सहकार्य करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.बैठकीला महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, महाआॅरेंजचे श्रीधर ठाकरे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, एमटीडीसीचे रिजनल मॅनेजर प्रशांत सवई, लोकमत समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग, लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर आदी उपस्थित होते. यावेळी अनिरुद्ध हजारे यांनी सादरीकरणाद्वारे महोत्सवाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर