शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात टँकर चालकांची संघटित गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:45 IST

नॉन नेटवर्क भागातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने टँकर लावलेले आहेत. परंतु अनेक टँकर चालक नागरिकांकडून पैशाची वसुली करतात. बांधकामासाठी पिण्याचे पाणी विकतात. नर्सरी, बर्फाचे कारखाने, हॉटेल चालक यांना पाणीपुरवठा करतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली टँकर चालकांची संघटित गुन्हेगारी सुरू आहे. नागरिकांचे पाणी विकले जात असल्याने नॉन नेटवर्क भागातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.

ठळक मुद्देबांधकाम, नर्सरी व हॉटेल चालकांना पाण्याची विक्री : नागरिकांची मात्र पाण्यासाठी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॉन नेटवर्क भागातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने टँकर लावलेले आहेत. परंतु अनेक टँकर चालक नागरिकांकडून पैशाची वसुली करतात. बांधकामासाठी पिण्याचे पाणी विकतात. नर्सरी, बर्फाचे कारखाने, हॉटेल चालक यांना पाणीपुरवठा करतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली टँकर चालकांची संघटित गुन्हेगारी सुरू आहे. नागरिकांचे पाणी विकले जात असल्याने नॉन नेटवर्क भागातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.सर्वाधिक टँकर असलेल्या उत्तर नागपूर, पूर्व व दक्षिण नागपुरात नागरिकांचे पाणी विकण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून सर्रास सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढल्याने टँकर चालक नागरिकांना वेठीस धरत आहेत. आसीनगर व मंगळवारी, नेहरूनगर, सतरंजीपुरा झोनमध्ये टँकर चालक पैशाची मागणी करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.ड्रमभर पाण्यासाठी काही टँकर चालक ५० ते २०० रुपयांची मागणी करतात. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके यांनी सोमवारी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांना वर्षभरात किती टँकर चालकांवर कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पाण्यासाठी अधिक वसुली होत असलेल्या भागातच आपल्या टँकरच्या फेऱ्या सुरू व्हाव्यात, यासाठी लॉबिंग केले जाते. संबंधित झोनमधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक टँकर चालक पाणी विकण्याचा धंदा करीत आहेत.- तर टँकर तात्काळ बंद करूमहापालिके ने शहरातील नॉन नेटवर्क भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर लावण्यात आले आहेत. पाण्यासाठी पैसे मागणाºया टँकर चालकावर तात्काळ कारवाई करून वर्षभरात किती टँकर चालकांवर कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला दिले आहेत. तसेच टँकर चालक पाण्यासाठी पैशाची मागणी करीत असेल तर थेट माझ्या मोबाईलवर नागरिकांनी संपर्क करावा, दोषी आढळल्यास असे टँकर तात्काळ बंद केले जातील.विजय झलके, सभापती जलप्रदाय समिती

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका