शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

नागपूर भाजपाचे संघटन पर्व ६ जुलैपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 11:21 IST

भाजपा शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रवीण दटके यांनी लागलीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. ६ जुलैपासून शहरात भाजपा संघटन पर्व सुरू करणार असून प्रत्येक मंडळाला ५० हजार नवीन सदस्य नोंदणीचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनवनियुक्त शहराध्यक्षांची घोषणा प्रत्येक मंडळाला ५० हजार नवीन सदस्य नोंदणीचे ‘टार्गेट’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रवीण दटके यांनी लागलीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. ६ जुलैपासून शहरात भाजपा संघटन पर्व सुरू करणार असून प्रत्येक मंडळाला ५० हजार नवीन सदस्य नोंदणीचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. आ.सुधाकर कोहळे यांच्याकडून शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रविवारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. कार्यक्रमस्थळी आग लागल्याने इमारतीच्या बाहेर अंधारात दटके यांना कार्यकर्त्यांशी बोलावे लागले.भाजपाच्या गणेशपेठ येथील शहर कार्यालयातील सभागृहात झालेल्या पदग्रहण सोहळ्यात खा.विकास महात्मे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, संदीप जाधव, भोजराज डुंबे, जयप्रकाश गुप्ता, सुभाष पारधी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे व मी तो सार्थ ठरवेल. आमच्या पक्षात नेतृत्व बदल सहज होतो. सर्व आमदार, नगरसेवक, महामंत्री, बूथ प्रमुख सर्वांचे सहकार्य घेऊन संघटन आणखी बळकट करण्यावर भर असेल. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत शहरातील सर्वच्या सर्व सहा जागा जिंकू असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला.यावेळी सुधाकर कोहळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जानेवारी महिन्यातच माझ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे पदमुक्त होता आले नाही.प्रभाकरराव दटके यांचे मला मौलिक मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्याच मुलाकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविताना समाधान वाटत आहे. दटके हे ऊर्जावान असून त्यांच्या क्षमतेचा पक्षाला फायदा होईल, असे कोहळे म्हणाले.कार्यक्रमाला रमेश भंडारी, किशन गावंडे, संजय ठाकरे, बंडू राऊत, दिलीप गौर, महेंद्र राऊत, हादी कदीर, देवेन दस्तुरे, प्रगती पाटील, डॉ.किर्तीदा अजमेरा,बबली मेश्राम, प्रभाकर येवले, मनीष मेश्राम, केतन मोहितकर, श्याम चांदेकर, दीपक वाडीभस्मे, नाना उमाठे, विजय केवलरामानी, चंदन गोस्वामी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी तलवारी चालतातयावेळी सुधाकर देशमुख यांनी आपल्या भाषणात कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. भाजपामध्ये अगदी सहजपणे अध्यक्ष बदलला जातो व कुणीही नाराज होत नाही.कॉंग्रेसमध्ये मात्र वर्षानुवर्षे एकच अध्यक्ष असतात. अध्यक्ष बदलताना तर तेथे तलवारी चालतात, कपडे फाडतात व वाद होतात, असे वक्तव्य त्यांनी केले.

टॅग्स :BJPभाजपा