शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यता मोहिमेनंतर भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुका

By योगेश पांडे | Updated: February 13, 2025 22:31 IST

ही मोहीम संपल्यावर पक्षात संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज्यपातळीवर दीड कोटी नवीन सदस्यांच्या नोंदणीवर भाजपकडून भर देण्यात येत आहे. ही मोहीम संपल्यावर पक्षात संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.गुरुवारी बावनकुळे यांनी नागपुरात पक्ष सदस्यता नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील उपस्थित होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच संघटनात्मक निवडणुका सुरू करण्याची परवानगी दिली होती. कार्यकर्त्यांच्या मदतीने १ कोटी ५१ लाख नवीन सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ४० दिवसांत एक कोटी दहा लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. १८ मार्चपर्यंत ४० लाखांहून अधिक सदस्य जोडले जातील. त्यानंतर संघटनात्मक निवडणुका होतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याला ५० ते १०० नवीन सदस्य बनवण्याचे लक्ष्य देण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंचायतीतून संसदेपर्यंत जाण्याचे लक्ष्य लक्षात घेऊन नवीन सदस्य बनवण्यात यावे, असे आवाहन केले. जगनाडे चौकातील एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली. यात प्रामुख्याने पूर्व विदर्भातील पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रत्येक बूथवर किमान २०० सदस्य आणि प्रत्येक कार्यकर्त्यामागे ५० ते १०० सदस्य करणे आवश्यक आहे. बूथ कार्यकर्त्यापासून ५० सदस्य बनवणारा कार्यकर्ताच राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी होऊ शकतो, असे सांगण्यात आले. बावनकुळे आणि कार्याध्यक्ष चव्हाण यांनी पूर्व विदर्भातील सदस्यत्वाचे लक्ष्य गाठणाऱ्या १० विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सरचिटणीस विक्रांत पाटील, राजेश पांडे यांनी सदस्यत्व आणि सक्रिय सदस्यत्व मोहिमेवर प्रकाश टाकला. व्यासपीठावर आमदार, माजी आमदार आणि राज्याचे अधिकारी उपस्थित होते. प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी संचालन केले, तर विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा