शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी येथे अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध होणार; चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 11:39 IST

एनएमआरडीएकडून भक्तनिवास हस्तांतरित

कोराडी (नागपूर) : कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्यावतीने लवकरच अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. येथील १६४ खोल्यांच्या भक्तनिवासात श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्स ॲण्ड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लॉंट हॉस्पिटल उभारले जाणार आहे. त्यासाठीचा इमारत हस्तांतरण सोहळा मंगळवारी पार पडला. यामाध्यमातून ऑर्गन ट्रान्सप्लॉंटची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष तथा भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात मंगळवारी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी व मंदिर संस्थानचे अध्यक्ष आ. बावनकुळे यांनी याबाबतच्या हस्तांरण करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी अप्पर आयुक्त अविनाश कातडे, अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, कार्यकारी अभियंता कल्पना इखार, सहाय्यक अभियंता नेपाल भाजीपाले, वास्तूविशारद नीशिकांत भिवगडे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र टोकेकर उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, नागपूर मध्यभारतातील हेल्थकेअर हबकडे वाटचाल करीत आहे. तथापि, येथे ऑर्गन ट्रान्सप्लॉंटसाठी सुविधा नसल्याने रुग्णांना हैदराबाद, मुंबई व चेन्नईकडे जावे लागते. यात मोठा खर्च होत असल्याने हा उपचार अत्याधिक खार्चिक होता. त्यामुळे नागपूर येथे ऑर्गन ट्रान्सप्लॉंट सुविधा निर्माण व्हावी अशी मागणी होती. कोराडी संस्थानचे भक्तनिवास यासाठी देण्यात यावे अशी मागणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला. आता भक्तनिवासाचे रुपांतर श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्स ॲण्ड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लॉंट हॉस्पीटलमध्ये होणार आहे.

सीएसआर फंडातून निधी उभारणार

या हॉस्पीटलच्या खर्चासाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उभारला जाणार आहे. यामुळे माफक दरात नागपूरसह मध्य भारतातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळतीळ. सोबतच देशातील नामांकित शल्यचिकित्सकांचे मार्गदर्शन व सेवा वेळोवेळी मिळणार आहे. या हॉस्पीटलकरिता नागपूर येथील तज्ज्ञ शल्यचिकित्सक व संस्थानच्या निवडक संचालकांचे विश्वस्त मंडळ तयार करण्यात येणार आहे. विश्वस्त मंडळाद्वारे श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्स ॲण्ड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लॉंट हॉस्पीटल संचालित केले जाणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर