शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान हीच खरी मानवसेवा  : रवी वानखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:18 IST

ब्रेन डेड झाल्यानंतर (मेंदू मृत) संबंधित व्यक्तीचे अवयवदान केल्यास इतरांना जीवनदान मिळू शकते. त्यासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेण्याची गरज असून अवयवदान हीच खरी मानवसेवा आहे, असे प्रतिपादन डॉ. रवी वानखेडे यांनी केले.

ठळक मुद्देजनमंचतर्फे अवयवदान काळाची गरज यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ब्रेन डेड झाल्यानंतर (मेंदू मृत) संबंधित व्यक्तीचे अवयवदान केल्यास इतरांना जीवनदान मिळू शकते. त्यासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेण्याची गरज असून अवयवदान हीच खरी मानवसेवा आहे, असे प्रतिपादन डॉ. रवी वानखेडे यांनी केले.जनमंचतर्फे अवयवदान काळाची गरज या विषयावर डॉ. रवी वानखेडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन शंकरनगरच्या बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी बालरोगतज्ज्ञ डॉ. विभावरी दाणी होत्या. व्यासपीठावर जनमंचचे अध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष डॉ. अमिताभ पावडे उपस्थित होते. डॉ. वानखेडे म्हणाले, अवयवदान कायदेशीर आहे. १९९४ मध्ये याबाबतचा कायदा झाला. अवयवदानात ४० ते ५० प्रकारचे अवयव दान करता येऊ शकतात. बोनमॅरो, किडनी, लिव्हर हे अवयव जिवंत व्यक्ती देऊ शकतात, तर मृत्यूनंतर सहा तासाच्या आत नेत्रदान, स्कीन दान करता येते. एका व्यक्तीच्या दोन डोळ्यांमुळे आठ जणांना दृष्टी मिळु शकते. मेंदू मृत झाल्याचे चार डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर नातेवाईकांना समजावून त्यांना अवयवदानासाठी प्रेरित करण्यात येते. मेंदू मृत झाल्यानंतर व्हेंटीलेटरमुळे दोन-तीन तासापासून तर दोन ते तीन दिवसापर्यंत अवयव जिवंत राहतात. देशात अवयवदानाची खूप गरज आहे. भारतात दरवर्षी दोन लाख किडनी लागतात. परंतु प्रत्यक्षात १० हजार प्रत्यारोपण होतात. विकसित देशात मेंदू मृत झालेल्या ९० टक्के नागरिकांचे अवयवदान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीयांनी नेत्रदान केल्यास लोकसंख्येमुळे आपण जगाला कॉर्निया पुरवू शकत असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कोणत्याही धर्मात अवयवदानाला विरोध नाही. अवयवदानासाठी नागपुरात नोटो संघटना असून, या संघटनेचे काम कसे चालते, ते त्यांनी सांगितले. डॉ. विभावरी दाणी यांनी मृत्यूनंतर त्वचा दान केल्यास व्यक्तीचा मृतदेह विद्रूप होत नसून, ही त्वचा पाच वर्षापर्यंत स्कीन बँकेत साठविता येत असल्याचे सांगून, अवयवदानाची चळवळ फोफावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जनमंचचे अध्यक्ष डॉ. शरद पाटील यांनी ग्रीन कॉरिडॉरमुळे मृत्यूनंतर अवयवांना व्हीआयपी वागणूक मिळते ही समाधानाची बाब असून, अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जनमंचचे उपाध्यक्ष अमिताभ पावडे यांनी प्रशिक्षण दिल्यासअवयवदानाबाबत जनजागृतीसाठी जनमंचचे सर्व कार्यकर्ते तयार राहू, असे आश्वासन दिले. संचालन सुहास खांडेकर यांनी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर