आता ऑनलाईनही अवयवदानाचा अर्ज भरणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 07:31 PM2020-06-27T19:31:17+5:302020-06-27T19:32:56+5:30

‘नागपूर ऑब्स्टेस्ट्रिक अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी’ (एनओजीएस) १ जुलै रोजी ‘जागतिक डॉक्टर दिना’निमित्त अवयवदान जनजागृत कार्यक्रम व मोबाईलवरच अवयवदान करण्याची लेखी प्रतिज्ञा ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या उपक्रमास सुरुवात करणार आहे.

Organ donation can now be filled online | आता ऑनलाईनही अवयवदानाचा अर्ज भरणे शक्य

आता ऑनलाईनही अवयवदानाचा अर्ज भरणे शक्य

Next
ठळक मुद्दे ‘एनओजीएस’चा पुढाकार : जागतिक डॉक्टर दिनी अवयवदानावर जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्याला डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड ही निसर्गाने दिलेली अवयवरूपी भेट. आपल्या मृत्यूनंतर आपण इतर गरजूंना हे अवयव दान देऊशकतो. या अवयव दानाने मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी देऊ शकतो. शिवाय, जिवंतपणीसुद्धा आपण रक्त व ‘टिश्यू’ दान करून सुमारे ७५ रुग्णांना जीवनदान देऊ शकतो. अवयवदानाची ही चळवळ घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी व यातील गैरसमजुती दूर करण्यासाठी ‘नागपूर ऑब्स्टेस्ट्रिक अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी’ (एनओजीएस) १ जुलै रोजी ‘जागतिक डॉक्टर दिना’निमित्त अवयवदान जनजागृत कार्यक्रम व मोबाईलवरच अवयवदान करण्याची लेखी प्रतिज्ञा ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या उपक्रमास सुरुवात करणार आहे.
‘एनओजीएस’च्या अध्यक्ष डॉ. वैदेही मराठे व सचिव डॉ. राजसी सेनगुप्ता यांनी सांगितले, अवयवदान करणे हे एक महान कार्य आहे. वेळेत अवयव न मिळाल्याने दरवर्षी सुमारे पाच लाख लोकांचा जीव जातो. यामुळे जिवंतपणी व मृत्यूपश्चात जास्तीत जास्त अवयवदान होणे आवश्यक आहे. अवयवदानाला घेऊन अनेक गैरसमजुती आहेत. त्यासुद्धा दूर होणे गरजेचे आहे. यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी बुधवारी एक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘अवयवदानाची गरज, गैरसमजुती व जनजागृती’ या विषयावर चर्चा केली जाईल. सर्वसामान्यांसाठी व डॉक्टरांसाठी ऑनलाईन परिषद, ‘ई-कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात आली आहे. यात संपर्ण दान, रक्तदान तसेच अवयवदानाची दंतकथा या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
‘कोविड-१९’च्या काळात एकमेकांना भेटणे अवघड आहे. यावर उपाय म्हणून अवयवदानासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आॅनलाईन लेखी प्रतिज्ञापत्र उपलब्ध करून दिले आहे. मोबाईलवरही अवयवदानाचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. भरलेला अर्ज प्राप्त होताच ‘नोटो’कडून एक देणगी कार्डही उपलब्ध होणार आहे. हे कार्ड सुरक्षितपणे ठेवणे अधिक सोपे असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्याना ऑनलाईन अवयवदानाचा अर्ज भरावयाचा आहे त्यांनी ‘नागपूर ऑब्स्टेस्ट्रिक अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी’शी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. मराठे व डॉ. सेनगुप्ता यांनी केले आहे.

Web Title: Organ donation can now be filled online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.