शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

पोलिसाकडून अवयवदान; शेवटचा श्वासही केला समाजाला अर्पण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 05:34 IST

पत्नीने ठेवला समाजापुढे आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिस आपल्या प्राणांची पर्वा करत नाही. ऋण फेडण्यासाठी शेवटचा श्वासही समाजाला अर्पण करतात. एका पोलिस कुटुंबाने असाच एक आदर्श समाजासमोर ठेवला. आपल्या पोलिस पतीच्या अवयवदानासाठी स्वत: पोलीस असलेल्या पत्नीने दु:ख बाजुला ठेवून अवयवदानासाठी पुढाकार घेतला. कोणत्याही प्रसंगाला सामोरा जाणारा वर्दीवाला तिच्यातही दिसला.

किशोर तिजारे त्या अवयवदात्याचे नाव. तिजारे हे पोलिस हवालदार म्हणून नागपूर शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. ८ ऑगस्ट रोजी त्यांचा अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना तपासून ‘ब्रेन डेड’ घोषित केले. पोलिस दलातच कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी सपना तिजारे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या दु:खातही अवयवदान करण्याचा मानवतावादी निर्णय त्यांचा पत्नीने घेतला. 

दोन रुग्णांना मिळाले जीवनदान ‘झेडटीसीसी’च्या नियमानुसार एक किडनी न्यू इरा हॉस्पिटलच्या ४७ वर्षीय रुग्णाला, तर दुसरी किडनी केअर हॉस्पिटलच्या ३० वर्षीय रुग्णाला दान करण्यात आली. कॉर्निआ महात्मे आय बँकेला देण्यात आले. वैद्यकीय कारणांमुळे त्यांचे यकृत दान होऊ शकले नाही. 

टॅग्स :Organ donationअवयव दान