शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

'इन्स्टा’वरुन ड्रग्जच्या ऑर्डर्स अन् कुरिअरने डिलिव्हरी; देवेंद्र फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

By योगेश पांडे | Updated: December 12, 2023 23:30 IST

'नायजेरियन तस्कर तर जाणूनबुजून करवून घेतात अटक'

नागपूर: विधानपरिषदेत अमली पदार्थांच्या तस्करीचा विषय चांगलाच गाजला व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत धक्कादायक खुलासेदेखील केले. ही तस्करी म्हणजे एकप्रकारे देशावरील हल्लाच आहे. एक मोठे सिंडिकेट यामागे काम करते व अनेकदा तर ‘डार्क नेट’ व ‘इन्स्टाग्राम’सारख्या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्सवरून हे रॅकेट चालते. तेथूनच ऑर्डर घेतल्या जातात व थेट कुरिअरने डिलिव्हरी होते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान या मुद्द्यावर फडणवीस यांनी राज्य शासनाकडून सुरू असलेल्या कारवायांबाबत सखोल माहिती दिली. कुरिअरमधून अमली पदार्थांची डिलिव्हरी होत असल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर आता कुरिअर कंपन्यांना विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, पोलिस विभागाकडून देखील अकस्मात तपासणी करण्यात येत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

- नायजेरियन कैद्यांसाठी डिटेंशन सेंटरअमली पदार्थांच्या तस्करीत नायजेरियन नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. मागील काही काळात राज्यात १७४ जणांना पकडण्यात आले. मात्र, नायजेरियातील या लोकांना ही कारवाई किंवा तात्पुरती अटक हवी असते. एकदा गुन्हा दाखल झाला की नियमांनुसार त्यांना खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या देशात थेट ‘डिपोर्ट’ करता येत नाही. याचा फायदा ते लोक उचलतात व परत रॅकेट सुरूच ठेवतात. त्यामुळे आता या लोकांना कारवाई झाल्यावर डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबईत एक केंद्र उभारण्यात आले आहे व इतरही केंद्र उभारण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

- मुंबईतील हुक्का पार्लर्स बंद करायावेळी हुक्का पार्लर्सच्या माध्यमातून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित केला. ही पार्लर्स अमली पदार्थांच्या डिलिव्हरीची केंद्र बनलेली आहेत व त्यांना बंद करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. मुंबईतून शाळा-महाविद्यालयांच्या जवळ असलेल्या २ हजार २६९ पानटपऱ्या तोडण्यात आल्या व ३८ हजार ८७३ ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

- देशपातळीवर ॲन्टि नार्कोटिक्स टास्क फोर्समहाराष्ट्रात अमली पदार्थांच्या रॅकेटवर कारवाईचे प्रमाण वाढले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्देशांनंतर देशातील विविध राज्यांत ॲन्टि नार्कोटिक्स टास्क फोर्स गठित झाल्या आहेत. विविध राज्यांकडून गुप्त माहिती एकमेकांना शेअर करण्यात येत आहे व त्यामुळे कारवाया वाढल्या आहेत. महाराष्ट्रात पोलिसांना एखाद्या ‘ड्रग्ज पेडलर’ला पकडल्यानंतर त्याच्या विविध लिंक शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDrugsअमली पदार्थnagpurनागपूरVidhan Parishadविधान परिषदvidhan sabhaविधानसभाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन