शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

नाशिकमध्ये महिला आरोपीला अवमानकारक वागणूक दिल्याची चौकशी करून कायदेशीर कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 18:30 IST

एका महिलेला नाशिकमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असताना तिला अवमानकारक वागणूक दिल्याची घटना घडली असून यामध्ये दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.

नागपूर : एका महिलेला नाशिकमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असताना तिला अवमानकारक वागणूक दिल्याची घटना घडली असून यामध्ये दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.

17 नोव्हेंबर रोजी अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरोने नाशिक आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेला पोलिस अधिकारी निवांत जगजीतसिंह जाधव (श्री.एन.जे.जाधव) यांस लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यांच्या विरोधात एका महिलेने तिच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार  नाशिक पोलिस आयुक्तालयात लेखी स्वरूपात केली होती. मात्र, कुठलीही कारवाई न करता व तिला व तिच्या पतीला आर्थिक गुन्हे शाखेने सीआरएस नंबर १५३/२०१६ नुसार अटक केली त्यावेळी तपास अधिकारी म्हणून असलेले एन.जे.जाधव तसेच त्यांचे वरिष्ठ या दोघांनी पैशाची मागणी करण्यात आली होती. सदरच्या मागणीनुसार महिला आरोपी आणि त्यांच्या भावाने दिलेले दोन लाख रुपये अजित पवार नामक व्यक्तीसह श्री.जाधव यांनी स्विकारले, उर्वरित पैशाकरिता सतत मानसिक त्रास देऊन महिला आरोपी यांचेसोबत अत्यंत अशोभनीय व निंदनीय प्रकार पोलिसांनी केला होता. याबाबतची लेखी तक्रार डीसीपी श्री. कराळे यांच्याकडे करण्यात आली होती परंतु सदरची तक्रार डीसीपी श्री. विजय मगर गुन्हे शाखा नाशिक यांनी महिला आरोपींच्या समक्ष फेटाळून लावली. त्यानंतर डिसेंंबर २०१६ ते जानेवारी, २०१७ रोजी एस.पी. साहेब यांच्याकडे तक्रार केली असता त्यानुसार सापळा रचला परंतु ऐनवेळी सापळा रद्द करण्यात आला.या संदर्भात जिल्हा व सत्र न्यायालयात संबधित पुरावे दाखल केले असता न्यायालयाने अ‍ॅन्टीेकरप्शन ब्युरोकडे संबधित पुरावे दाखल करण्यास सांगूनही या खटल्यात साक्षीदार म्हणून राहण्यास सांगितल्यानुसार अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरोकडे त्या पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरी शासनाने याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेतील संबधित अधिका-यांची सदर महिलेबरोबर अशोभनीय वागणूक तसेच लाच घेतल्याप्रकरणी चौकशी करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यासाठी मोठमोठया आस्थापनांनी कायदयाची अंमलबजावणी न करता कारवाई धुडकावून लावली होती. याबाबत आ.गोऱ्हे यांनी अशा प्रकारच्या घटनांसंदर्भात निगराणी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची आवश्यकता असल्याचे औचित्यच्या मुद्द्याद्वारे व्यक्त केली. तसेच या केस मध्ये उच्चस्तरीय महिला अधिका-यांची नियुक्ती करून वरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशीही मागणी यावेळी केली. या मुद्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश तात्काळ दिले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा