शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात स्कूलबस थांबे निश्चित करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 19:38 IST

सध्या स्कूलबसेसना हक्काचे थांबे नाहीत. विद्यार्थ्यांसाठी स्कूलबसेस मनमानी पद्धतीने कुठेही थांबविल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अपघात होतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी हा विषय अत्यंत गंभीरतेने घेतला व स्कूलबसेस कुठेही कशा थांबविता, असा सवाल उपस्थित करून स्कूलबसेसकरिता आठ आठवड्यांत शहरभरात थांबे निश्चित करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिला तसेच यासंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले.

ठळक मुद्देस्कूल बसेस कुठेही कशा थांबवता? हायकोर्टाचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या स्कूलबसेसना हक्काचे थांबे नाहीत. विद्यार्थ्यांसाठी स्कूलबसेस मनमानी पद्धतीने कुठेही थांबविल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अपघात होतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी हा विषय अत्यंत गंभीरतेने घेतला व स्कूलबसेस कुठेही कशा थांबविता, असा सवाल उपस्थित करून स्कूलबसेसकरिता आठ आठवड्यांत शहरभरात थांबे निश्चित करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिला तसेच यासंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालय मित्र अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी नियमानुसार स्कूलबसेसकरिता थांबे निश्चित करणे आवश्यक असल्याचे सांगून, शहरात सध्या अशी व्यवस्था नसल्याची माहिती दिली. परिणामी, न्यायालयाने हा आदेश दिला. याविषयी न्यायालयाने २०१२ मध्ये स्वत:च जनहित याचिका केली आहे. आतापर्यंत न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे स्कूलबस परिवहनात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत. स्कूलबस नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रकरणात १३७ शाळांना प्रतिवादी करण्यात आले आहे. शाळांनी आधी मुजोरीची भूमिका घेतली होती. परंतु, आवश्यक दणके दिल्यानंतर सर्व शाळा सुतासारख्या सरळ होऊन न्यायालयात हजर झाल्या.उन्हाळ्यात स्कूलबसेसची तपासणीप्रादेशिक परिवहन विभाग येत्या उन्हाळ्यात स्कूलबसेस व स्कूलव्हॅन्सची तपासणी करणार आहे. तपासणीमध्ये ही वाहने नियमानुसार आहेत किंवा नाही, हे पाहिले जाणार आहे. विदर्भातर्फे ही माहिती न्यायालयाला देण्यात आली.

टॅग्स :SchoolशाळाBus Driverबसचालक