शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

ग्राहक मंचचा आदेश : ५१ हजार १८ टक्के व्याजाने परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 10:10 PM

तक्रारकर्तीचे ५१ हजार रुपये १८ टक्के व्याजाने परत करण्यात यावे व तिला २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंबिका बिल्डकॉनला दिलेत.

ठळक मुद्देअंबिका बिल्डकॉनला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्तीचे ५१ हजार रुपये १८ टक्के व्याजाने परत करण्यात यावे व तिला २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंबिका बिल्डकॉनला दिलेत.दीप्ती क्रिष्णानी असे तक्रारकर्तीचे नाव आहे. ५१ हजार रुपयांवर १० डिसेंबर २०१० ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू होणार आहे. भरपाईमध्ये शारीरिक-मानसिक त्रासाचे २० हजार व तक्रार खर्चाच्या ५ हजार रुपयांचा समावेश आहे. आदेशांचे पालन करण्यासाठी कंपनीला ३० दिवसाची मुदत देण्यात आली. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे अंबिका बिल्डकॉनला जोरदार दणका बसला.तक्रारीतील माहितीनुसार, क्रिष्णानी यांनी अंबिका बिल्डकॉनच्या मौजा गोधनी येथील अंबिका इस्टेट योजनेतील थ्री-बीएचके घर ८ लाख ५० हजार रुपयांत खरेदी करण्यासाठी १० डिसेंबर २०१० रोजी करारनामा केला होता व कंपनीला इसार म्हणून ५१ हजार रुपयाचा धनादेश दिला होता. त्यानंतर कंपनीने संबंधित ठिकाणी डिसेंबर-२०१३ पर्यंत कोणतेही बांधकाम केले नाही. तसेच, ते क्रिष्णानी यांची भेट घेणे टाळत होते. त्यामुळे क्रिष्णानी यांनी कंपनीला १५ आॅक्टोबर २०१६ रोजी कायदेशीर नोटीस पाठवली. कंपनीने त्यावरही काहीच प्रतिसाद दिला नाही. परिणामी, क्रिष्णानी यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने त्यांची तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे निर्णय दिला.तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिलीकंपनीने तक्रारकर्तीच्या नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच, त्यांची भेट घेणेही टाळले. तक्रारकर्ती ही कराराप्रमाणे उर्वरीत रक्कम देऊन घराचे विक्रीपत्र नोंदवून घेण्यास तयार होती. परंतु, कंपनीने साईटवर कोणतेही बांधकाम केले नाही. कराराची पूर्तता केली नाही. अशा प्रकारे कंपनीने तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिली. अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे