शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑरेंज सिटी स्ट्रीट रोड : चार महिन्यापूर्वी खोदकाम पण काम सुरू होईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 23:44 IST

महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑरेंज सिटी स्ट्रीट अंतर्गत वर्धारोड ते जयताळा या दरम्यान ५.५० किलोमीटरचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता निर्माण केला जात आहे. हैदराबाद बेस्ड कंपनी मधुकोन प्रोजेक्ट लिमिटेडला कामाचे कंत्राट दिले आहे. कंपनीने जयताळापासून जवळपास एक किलोमीटर पर्यंत डांबरी रस्ता खोदून ठेवला आहे. परंतु सिमेंट काँक्रिटीकरण सुरू केलेले नाही. यामुळे गेल्या चार महिन्यासून नागरिक त्रस्त आहेत. महापालिका  अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यात कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे.

ठळक मुद्दे१५महिन्यात अपेक्षित आहे ५.५० कि.मी.चा रस्तामनपा अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कंत्राटदार जुमानेना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑरेंज सिटी स्ट्रीट अंतर्गत वर्धारोड ते जयताळा या दरम्यान ५.५० किलोमीटरचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता निर्माण केला जात आहे. हैदराबाद बेस्ड कंपनी मधुकोन प्रोजेक्ट लिमिटेडला कामाचे कंत्राट दिले आहे. कंपनीने जयताळापासून जवळपास एक किलोमीटर पर्यंत डांबरी रस्ता खोदून ठेवला आहे. परंतु सिमेंट काँक्रिटीकरण सुरू केलेले नाही. यामुळे गेल्या चार महिन्यासून नागरिक त्रस्त आहेत. महापालिका  अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यात कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे.५३.१० कोटींच्या खर्चाच्या याकामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष फंडातून निधी उपलब्ध केला आहे. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप येथे भेट दिलेली नाही. ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प महापालिकेतील सत्तापक्षाचा ड्रीम प्रकल्प आहे. परंतु कार्यादेश झाल्यानंतर १५ महिन्यात रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या चार महिन्यापासून रस्ता खोदून ठेवला आहे. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत आहे. अशा परिस्थितीत सप्टेंबरपर्यंत रस्त्यांचे काम पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी महिन्यात या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे मधुकोन कंपनीवर जागतिक बँकेने एका प्रकल्पासंदर्भात अडीच वर्षापूर्वी प्रतिबंध घातले होते. याची तक्रार प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणारे कार्यकारी अभियंता(प्रकल्प)नरेश बोरकर यांच्याकडे करण्यात आली होती. स्थायी समितीच्या निदर्शनास ही बाब आणली होती. त्यानंतरही याच कंपनीला काम देण्यात आले.विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आधीच केली होती. कंत्राटदरावर नजर ठेवण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. अधिकाऱ्यांकडे यासाठी वेळ नसेल तर त्यांच्याकडील जबाबदारी परत घ्यावी, अशी भूमिका विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी मांडली.कासव गतीला जबाबदार कोण?सार्वजनिक विभागात बदली झाल्यानंतरही प्रकल्पाची जबाबदारी कार्यकारी अभियंता (प्रकल्प)नरेश बोरकर यांच्याकडेच आहे. ते महापालिके त क्वचितच दिसतात. प्रकल्पाचे काम कासव गतीने सुरू असल्यासंदर्भात बोरकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता आऊ ट ऑफ कव्हरेज होते. महापालिका कार्यालातही ते उपस्थित नव्हते. रस्त्यासंदर्भात महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी रस्ता खोदल्याची माहिती दिली. यावर बोरकर हेच निर्णय घेऊ शकतात. यामुळे त्यांची बदली दुसऱ्या विभागात केली असताना महापालिकेचे प्रकल्प त्यांच्याकडे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रकल्पाची अशी अवस्था असेल तर दुसऱ्या प्रकल्पाचा विचारही न केलेला बरा.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर