शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ऑरेंज अलर्ट; वादळी पावसासह गारा पडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 13:26 IST

Nagpur News हवामान केंद्राच्या नागपूर प्रादेशिक विभागाने पुढील चार दिवसात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. १९ मार्चला नागपूरसह वर्धा आणि गोंदीया या तीन जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देतासी ३० ते ४० किलोमीटर वेगाचे असेल वादळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवामान केंद्राच्या नागपूर प्रादेशिक विभागाने पुढील चार दिवसात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. १९ मार्चला नागपूरसह वर्धा आणि गोंदीया या तीन जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या वादळाचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.१७ ते २० मार्च हे चार दिवस विदर्भात पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, १७ मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या आठ जिल्ह्यांत तुरळक पावसाचा इशारा दिला आहे. १८ व २० मार्चला सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार असून १९ मार्चला विजेच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रति ताशी वेगाचे हे वादळ नुकसान पोहोचवू शकते. यामुळे शेतक?्यांना आणि नागरिकांना हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिला आहे.मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतक?्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भाजीपाला तसेच आंब्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही सल कायम असतानाच पुन्हा नवे अस्मानी संकट घोंगावत आहे.सोमवारपासूनच वातावरणात बदल जाणवत आहे. दोन दिवसांपासून आकाश ढगाळलेले असून तापमानातही घट झाली आहे. नागपुरातील मंगळवारचे कमाल तापमान ३७.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अमरावती आणि वर्धा येथील तापमान अनुक्रमे ३७.४ व ३७.५ अंश सेल्सिअस होते. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे ३९.२ अंश नोंदविले गेले तर सर्वात कमी तापमान गोंदीया येथे ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अकोला, बुलडाणा आणि गडचिरोली येथे ३८ अंश सेल्सिअस तर यवतमाळात ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे..

टॅग्स :Rainपाऊस