शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहातही विरोधकांचा हल्लाबोल, शेतकरी कर्जमाफीवर सरकारची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:23 IST

- आनंद डेकाटेनागपूर : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळात आक्रमक धोरण अवलंबिले. यामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तर परिषदेचे कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आले. परंतु त्यानंतरही विरोधक आपल्या धोरणावर कायम असल्यामुळे संपूर्ण दिवसभराचे कामकाज स्थगित करावे लागले.विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी शेतक-यांना सरसकट ...

- आनंद डेकाटेनागपूर : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळात आक्रमक धोरण अवलंबिले. यामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तर परिषदेचे कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आले. परंतु त्यानंतरही विरोधक आपल्या धोरणावर कायम असल्यामुळे संपूर्ण दिवसभराचे कामकाज स्थगित करावे लागले.विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी शेतक-यांना सरसकट कर्जमाफी मिळावी असे आक्रमक धोरण अवलंबिले. विरोधी पक्षाच्या सदस्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आसनासमोर जाऊन नारेबाजी करू लागले. या गोंधळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. परंतु विरोधकांच्या नारेबाजीमुळे पहिला प्रश्न व्यवस्थित विचारताही आला नाही. गोंधळ वाढत असल्याने अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले. दहा मनिटिानंतर कामकाज सुरू झाले, तेव्हा योगेश सागर हे तालिका अध्यक्ष होते. त्यांनी पहिला प्रश्न पुकारला परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची नारेबाजी सुरूच होती.त्यामुळे ३० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले. त्यानंतरही पहिला प्रश्न गोंधळातच आटोपता घेत १५ मिनिटांसाठी पुन्हा कामकाज स्थगित करावे लागते. दुपारी १२.५ मिनिटंनी सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हासुद्धा विरोधकांनी नारेबाजी सुरूच होती.तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी या गोंधळात सुरुवातीचे सर्व कामकाज पुढे ढकलले. तसेच या गोंधळात एक विधेयक सादर करण्यास सांगून संपूर्ण दिवसाचे कामकाज स्थगित केले.

वडेट्टीवार यांना गोंधळात वाढदिवसाच्या शुभेच्छाकॉँग्रेसचे नेते व विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांचा मंगळवारी वाढदिवस होता. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नारेबाजी करीत होते. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी या गोंधळातच वड्डेटीवार यांचा वाढदिवस असल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.आव्हाड यांनी उडविले कागदाचे विमानसभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले होते. अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन सदस्य नारेबाजी करू लागले होते. यात जितेंद्र आव्हाड अग्रेसर होते. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सुरुवातीला आव्हाड यांनी बसून जाण्याची विनंती केली. तर तालिका अध्यक्ष योगेश सागर आसनावर असताना आव्हाड यांनी कागदाचे विमान उडविले. यावरून सागर यांनी त्यांचे नाव घेऊन ‘विमान उडवायचे असेल तर विमानतळावर जा’ असा चिमटा काढला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७nagpurनागपूर