शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

- तर विरोधकांना बॉम्बवर बसवून पाठवायचे होते : सतपाल महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:19 IST

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानात एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. यात अनेक दहशतवादी मारले गेले. पण विरोधक यातही राजकारण करीत किती दहशतवादी मारले गेले, याचा पुरावा मागत आहेत. या विरोधकांना बॉम्बवर बसवून पाकिस्तानात पाठवायचे होते, तेव्हाच मृतांचा खरा आकडा कळाला असता, अशी टीका उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी केली.

ठळक मुद्देगडकरींच्या प्रचार सभेत टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानात एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. यात अनेक दहशतवादी मारले गेले. पण विरोधक यातही राजकारण करीत किती दहशतवादी मारले गेले, याचा पुरावा मागत आहेत. या विरोधकांना बॉम्बवर बसवून पाकिस्तानात पाठवायचे होते, तेव्हाच मृतांचा खरा आकडा कळाला असता, अशी टीका उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी केली.भाजपाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या मिनीमातानगर येथील प्रचार सभेत ते बोलत होते. गडकरी यांच्या प्रचारासाठी पूर्व नागपुरात सोमवारी पारडी बाजार व दर्शन कॉलनीमध्ये सभा घेण्यात आल्या. मिनीमातानगरच्या सभेला आ. कृष्णा खोपडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेविका चेतना टांक, सरिता कावरे, नगरसेवक बाल्या बोरकर, अनिल गेंडरे आदी उपस्थित होते. यावेळी सतपाल महाराज म्हणाले, गडकरी यांनी देशाचे चित्र बदलले आहे. गावापासून शहराला, शहरापासून राज्याला आणि देशाला रस्त्यांनी, जलमार्गाने जोडले आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारताचा सर्वांगीण विकास करणारा लोकप्रिय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ख्याती आहे. या लोकनेत्यांची प्रतिष्ठा उंचावण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. बायो-फ्युएलवर धावणारी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स कार, बसेस रस्त्यावरून धावत आहेत. जशी लक्ष्मी कमळावर बसून येते तसा विकासही कमळामुळेच होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने देशाला स्वाभिमान आणि सुरक्षा प्रदान केली आहे. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार सर्वांसाठीच मोदी सरकारने अतिशय उपयुक्त योजना राबविल्या. पाकिस्तानला धडा शिकवून भारतीय सैन्याचे मनोबल उंचावले. हा देश जगाच्या पाठीवरील कुठल्याही दहशतवादाला आता घाबरणारा नाही हे सिद्ध केले आहे, असेही त्यांनी सांगितले.एक लाख लोकांना पाच लाखात घर : गडकरीगाव, गरीब, मजूर आणि शेतकरी यांचे कल्याण व्हावे, हेच माझे स्वप्न आहे. शहराच्या आधुनिक विकास होत असताना,झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे माझे स्वप्न आहे. आतापर्यंत आम्ही १० हजार लोकांना घरकूल उपलब्ध करून दिले आहे. येणाऱ्या काळात एक लाख लोकांना पाच लाखामध्ये त्यांच्या हक्काचे घरकूल उपलब्ध करून देण्याचा माझा मानस असल्याचे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. पुन्हा संधी मिळाल्यास नागपूर हे जगाच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.कलावंतांना जपणाऱ्या नेत्यामागे राहा : प्रभाकर धाकडेनागपुरात सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कलावंतांना प्रोत्साहन देण्याची गरज होती, ती नितीन गडकरी यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून पूर्ण केली. त्यामुळे कलावंतावर प्रेम करणाऱ्या नेत्याच्या मागे आगामी निवडणुकीत उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सूरमणी प्रभाकर धाकडे यांनी केले. नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ जवाहर वसतिगृहात सांस्कृतिक आघाडीतर्फे कलावंतांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी गडकरी म्हणाले, कलावंतांना आपल्या क्षेत्रात कायम संघर्ष करावा लागतो. ज्येष्ठांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्यावेळी आर्थिक मदतीची गरज असते. आगामी काळात कलावंतांना येणाऱ्या समस्यांविषयी काम करणार असून, त्याचसोबत नव्या पिढीतील कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणार. आजवर डॉ. देशपांडे सभागृह तसेच नवनिर्मित सुरेश भट सभागृह कलावंतांसाठी अतिशय अल्पदरात उपलब्ध करून देण्याचे काम केले. येत्या काळात अंबाझरी येथे ३० आसनक्षमता असलेले ओपन एअर थिएटर साकारण्याचा मानसही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजपाचे राजेश बागडी, प्रा. संजय भेंडे, जयप्रकाश गुप्ता, ज्येष्ठ कलावंत शक्ती रतन आदी उपस्थित होते. यावेळी नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे निवृत्त विभागप्रमुख विनोद इंदूरकर यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे संचालन मोहम्मद कलीम यांनी केले. आभार आसावरी तिडके यांनी मानले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Gadkariनितीन गडकरी