शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शुल्कवाढ स्थगितीला संस्थाचालकांचा विरोध; नागपूर विद्यापीठासमोर आंदोलन

By आनंद डेकाटे | Updated: September 16, 2022 18:10 IST

२० टक्के शुल्कवाढ लागू करण्याची मागणी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयीन शुल्कामध्ये २० टक्के शुल्कवाढ केली होती. परंतु विद्यार्थी संघटनांचा या शुल्कवाढीला प्रचंड विरोध होता. याविरुद्ध विद्यार्थी संघटनांनी सातत्याने आंदोलन केले. त्यामुळे विद्यापीठाने या निर्णयाला स्थगिती दिली. आता या स्थगितीच्या विरोधात संस्थाचालक रस्त्यावर उतरले आहेत. स्थगिती रद्द करून शुल्कवाढ लागू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी संस्था चालकांनी विद्यापीठ प्रशासन भवनासमोर निदर्शने केली.

निदर्शनानंतर शिष्टमंडळाने कुलगुरु डाॅ. सुभाष चौधरी यंची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. संस्था चालकांचे म्हणणे आहे की, विद्यपीठाने तब्बल ९ वर्षानंतर गेल्या ६ ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून महाविद्यालयीन शुल्कामध्ये २० टक्के वाढ केली. शासन नियम, व उच्च न्ययायालयाच्या निर्णयाप्रमाणे तसेच महागाई, कर्मचाऱ्यांचे सातत्याने वाढणारे वेतन लक्षात घेता विद्यापीठाने वाढवलेली शुल्कवाढ योग्य होती.

सामान्य विद्यार्थ्यांना या शु्ल्कवाढीचा कुठलाही परिणाम हाेत नाही. कारण एससी, एसटी, ओबीसी, मराठा,  अल्पसंख्यांक आणि खुल्या प्रवर्गातील अल्प उत्पन्न गट धारक विद्यार्थ्यांची संपूर्ण फी, राज्य शासन शिष्यवृत्ती व इतर संसाधनातुन महाविद्यालयांकडे परस्पर भरत असते. असे असताना काही संघटनांच्या दबावामुळे विद्यापीठाने या शुल्कवाढीच्या निर्णयाला स्थगिती दिली. शु्लकवाढीवरील ही स्थगिती तातडीने तातडीने हटविली नाही तर संस्थाचालक विद्यापीठाला असहकार्य करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

विद्यापीठ महाविद्यालयीन संस्था चालक महासंघातर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनात समन्वयक प्रा. दिवाकर गमे, प्रा.डाॅ. मारोती वाघ, अंतु भिवगडे, डाॅ. राजेश भोयर, डाॅ. संजय धनवटे, संदिप काळे, पांडुरंग तुळसकर,प्रविण कडु, डाॅ. सारिका चौधरी, प्रविण भांगे,उदय टेकाडे,डाॅ.सचिन बोंगावार,प्रा. विजय टेकाडे,डाॅ. सतिश भोयर,रविंद्र बिजवे, प्रशांत जांभुळकर,डाॅ. सचिन बोंगावार,डाॅ.संजय चोरे आदींचा समावेश होता.

टॅग्स :agitationआंदोलनRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर