शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जाती आधारित आरक्षणाला विरोधामुळे ॲट्रॉसिटी होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:23 IST

हायकोर्ट : बापलेकीची आरोपमुक्ती कायम

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जाती आधारित आरक्षणाचा विरोध केल्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयामध्ये स्पष्ट केले. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.

मध्य प्रदेश येथील प्रियमवदा चौधरीने मित्र विशाल वाडेकरसोबत व्हॉट्स ॲप मॅसेजद्वारे संवाद साधताना जाती आधारित आरक्षणाला विरोध केला होता. त्यावेळी दोघेही नागपूरमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे विशालने अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता, प्रियमवदा व तिचे वडील अनुपकुमार यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. तसेच पोलिसांनी विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. त्यामुळे चौधरी बाप-लेकीने स्वतः ला आरोपमुक्त करून घेण्यासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला होता. 

तो अर्ज ५ ऑगस्ट २०२१ रोजी मंजूर करण्यात आला. त्या निर्णयाविरुद्ध विशालने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता चौधरी बाप-लेकीने कोणताही गुन्हा केला नसल्याचे सांगून विशालची याचिका फेटाळून लावली. 

तक्रारीला पाच महिने विलंब चौधरी बाप-लेकीतर्फे ॲड. आर. के. तिवारी यांनी बाजू मांडताना पोलिस ठाण्यात पाच महिने विलंबाने तक्रार दिली गेली व ही तक्रार वैयक्तिक रागातून करण्यात आली, याकडे लक्ष वेधले. तसेच प्रियमवदाने सार्वजनिकरीत्या कोणत्याही आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला नाही. तिने केवळ विशालसोबत बोलताना स्वतः ची भूमिका मांडली. त्यामुळे, तिची कृती अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा ठरत नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर