शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट अभयारण्यातून जाणाऱ्या रेल्वे लाईनला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 20:53 IST

मेळघाट व्याघ्र अभयारण्यातून जाणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वनसंपदा व वन्यजीवांची सुरक्षा लक्षात घेता या लाईनचा मार्ग बदलविण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात आव्हान : मार्ग बदलविण्याची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेळघाट व्याघ्र अभयारण्यातून जाणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वनसंपदा व वन्यजीवांची सुरक्षा लक्षात घेता या लाईनचा मार्ग बदलविण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.प्रमोद जुनघरे असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. २१ जून २०१८ रोजी रेल्वे मंत्रालयाने खंडवा (मध्य प्रदेश) ते आकोट या ब्रॉडगेज रेल्वे लाईनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून त्यापैकी ५१ किलोमीटरची रेल्वे लाईन मेळघाट व्याघ्र अभयारण्याच्या बफर झोनमधून जाते. २०१४ मध्ये राज्य सरकारने अभयारण्यातून जाणाऱ्या रेल्वे लाईनला मान्यता नाकारली होती. त्यानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पर्यायी मार्ग मंजूर केला होता. त्यामुळे रेल्वे मार्गाची लांबी ३० किलोमीटरने वाढून खर्चात ७४० कोटी रुपयांची भर पडत होती. परिणामी, तो प्रस्ताव बाजूला ठेवून अभयारण्यातून जाणाऱ्या रेल्वे लाईनलाच हिरवी झेंडी देण्यात आली आहे. या रेल्वे लाईनमुळे वनसंपदा व वन्यजीवांना मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे लाईनचा मार्ग बदलविणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.रेल्वे मंत्रालयाला मागितले उत्तरउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी बुधवारी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर रेल्वे मंत्रालय, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे व राज्य सरकारला नोटीस बजावून याचिकाकर्त्याच्या म्हणण्यावर तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMelghatमेळघाट