शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मोबाईल टॉवरला नागपुरातील फाळके ले-आऊटच्या नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:34 IST

मोबाईल टॉवरचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेता, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशात फाळके ले-आऊटमध्ये एक बिल्डर परिसरातील रहिवाशांची परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभारत आहे. टॉवरचे रेडिएअशन लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने फाळके ले-आऊटच्या लोकांचा अवैधरीत्या उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरला विरोध होत आहे.

ठळक मुद्देरहिवाशांची परवानगी न घेता उभारला जातोय टॉवर : नागरिकांच्या प्रशासनाकडे तक्रारी पण दखल नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मोबाईल टॉवरचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेता, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशात फाळके ले-आऊटमध्ये एक बिल्डर परिसरातील रहिवाशांची परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभारत आहे. टॉवरचे रेडिएअशन लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने फाळके ले-आऊटच्या लोकांचा अवैधरीत्या उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरला विरोध होत आहे.फळके ले-आऊट मधील ३८ क्रमांकाच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या इमारतीवर दीपक सोनी यांच्याकडून अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारणीच्या बांधकामास सुरुवात केली आहे. सोनी यांनी मोबाईलचे टॉवर उभारताना आजूबाजूच्या लोकांची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. रेडिएशन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते मोबाईल टॉवर जिथे उभा होतो, तेथून ३०० ते ४०० मीटर अंतरावर ७ ते ८ हजार मायक्रोवॅट रेडिएशन होते. रेडिएशनचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. डोकेदुखी, चिडचिड वाढणे यासारख्या समस्या वाढतात. ४ ते ५ वर्ष सातत्याने टॉवरच्या संपर्कात राहिल्यास ब्रेनट्युमर, ब्रेनकॅन्सरसारखे आजार वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे. अशात दीपक सोनी कुठलीही परवानगी न घेता, टॉवर उभारत आहे. हे टॉवर अनाधिकृत असून, टॉवरचे बांधकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी नासुप्रकडे केली आहे. यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासने गिट्टीखदान पोलीस स्टेशनकडे कारवाई संदर्भात तक्रार पाठविली आहे. कुठल्याही परिस्थितीत टॉवर उभारण्यात येऊ नये, अशी मागणी येथील ज्ञानेश्वर वाकोडीकर, जानराव, चैतराम पौनीकर, मधुकर हेलोंडे, दुर्गेश रॉय, पंजाबराव काकडे, मधुकर डोये, व्यंकट डोये, प्रभाकर डोये, मनोहर डोये, कृष्णा बोराटे, रेखा पौनीकर, सोनिया किनरा, नाजिया शेख, जितेंद्र किनरा, संगीता मारवडकर, पराग वैद्य, ऋषिकेश कथलकर, मीरा वरखडे, गंगाधर आंभोरे, नीलेश भुसारी, संजय शिंगणे, लता बोंद्रे, उषा प्रसाद, संजय फिस्के, प्रशांत ठाकरे आदींनी केली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलnagpurनागपूर