शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या भीतीमुळे पळालेले एनडीएसोबत, वृंदा करात यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 11:21 IST

‘इंडिया’ सामान्यांचा आवाज बनेल

नागपूर : विरोधी पक्षातील लोकांना ईडी, सीबीआयची भीती दाखवून त्यांच्या पक्षापासून तोडण्यात आले व नंतर त्यांना भाजपने आपल्या सोबत घेतले. ईडीच्या भीतीमुळे पळालेले आज एनडीएसोबत असल्याचे चित्र देशाला पाहायला मिळत आहे, अशी टीका माकपा पोलिट ब्यूरोच्या सदस्य व माजी खासदार वृंदा करात यांनी केली.

आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या बैठकीसाठी वृंदा करात या मंगळवारी नागपुरात आल्या होत्या. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, भाजपला काहीही करून सत्ता हवी आहे. त्यांना तत्त्वांशी घेणेदेणे नाही. २४ विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेले ‘इंडिया’ ही आघाडी जनतेचा आवाज बुलंद करेल. महागाई व बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर आवाज उठवेल. ही आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काम करेल. आता विरोधी पक्षांवर मोठी जबाबदारी आली आहे. कोणत्याही परिस्थितीत एकजुटीने राहण्याची वेळ आली आहे. हे सर्व पक्ष देश व संविधान वाचविण्यासाठी एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सचिव अरुण लाटकर उपस्थित होते.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येणार

- महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते योग्य नाही. राज्यात पुन्हा एक राजकीय भूकंप येईल, असा दावा करात यांनी केली. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच सत्तेत वाटा दिला. भाजपच्या मशीनमध्ये सर्व स्वच्छ होतात, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा