शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सीमावादावर ठराव आणा, जशास तसे उत्तर द्या; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2022 10:37 IST

Maharahstra Winter Session 2022 :  एकेक इंच जागा महाराष्ट्रात आली पाहिजे, हिच आमची भूमिका 

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याबाबत पुन्हा एकदा म्हटल्यानंतर यात आणखी ठिगणी पडण्याची शक्यता आहे. तर सीमावादाचा मुद्दा उफाळून आलेला असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादावरील ठराव हिवाळी अधिवेशनात आणण्यात यावा, अशी मागणी बुधवारी केली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सातत्याने तिथल्या लोकांना बरं वाटावं म्हणून आक्रमक वक्तव्य करीत आहेत. आपल्यादेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावर आक्रमक भूमिका घेत जशास तसे उत्तर द्यायला हवे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सीमावादावरील ठराव आणण्याबाबत चर्चा झाली होती. तेव्हा सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात हा ठराव कधी मांडणार याबाबत आम्ही सरकारला विचारणा आहे. सीमाभागातील एकेक इंच जागा महाराष्ट्रात आली पाहिजे, हिच आमची भूमिका आहे असे पवार यांनी सांगितलं.

बेळगाव, निपाणी, कारवार, भिलकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. सीमावादावरील ठराव आल्यास त्याला विरोधी पक्षाचे समर्थन राहील, असे अजित पवार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAjit Pawarअजित पवारKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र