शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तोंडावर सिगारेटचा धूर सोडल्याचा विरोध केल्याने नागपुरात खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 10:37 IST

सिगारेटच्या धूर चेहऱ्यावर आल्याने झालेल्या वादात असामाजिक तत्त्वांनी दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्री शंकरनगर चौकातील शिवाजीनगर येथे घडली.

ठळक मुद्देशिवाजीनगरातील घटनादोन तरुण गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिगारेटच्या धूर चेहऱ्यावर आल्याने झालेल्या वादात असामाजिक तत्त्वांनी दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्री शंकरनगर चौकातील शिवाजीनगर येथे घडली. श्रीकांत कश्यप आणि सूरज शेंडे अशी जखमींची नावे आहे. शिवाजीनगर येथील एचडीएफसी बँकेजवळ रात्री चार चाकी वाहनात एक पानठेला लागतो. रात्री १२.१५ वाजता श्रीकांत आणि सूरज पानठेल्यावर खर्रा घेण्यासाठी आले. तिथे पाच-सहा युवक अगोदरपासूनच उभे होते. त्यातील काही युवक सिगारेट ओढत होते. दरम्यान आरोपी युवकांनी सिगारेटचा धूर श्रीकांतच्या चेहºयाजवळ सोडला. श्रीकांतने त्यांना समजावू लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. पाहता-पाहता इतर युवकांनी श्रीकांत व सूरजवर हल्ला केला. श्रीकांतला पकडून त्याच्या डोक्यावर वार केले. यामुळे श्रीकांत बेशुद्ध झाला. हल्लेखोरांनी त्याच्या पायावर दगडाने वार केला. हल्लेखोरांनी सूरजलाही मारहाण करून जखमी केले. घटनेच्या वेळी पानठेला चालकासह इतर लोकही उपस्थित होते. परंतु कुणीही मदतीसाठी धावले नाही. दोघांना जखमी करून हल्लेखोर फरार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

आरोपींची संख्या लपवलीसूत्रानुसार या घटनेत पाच ते सहा आरोपी होते. पोलीस केवळ तीन लोकांनीच हल्ला केल्याचे सांगत आहे. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा