शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कदमांच्या विरोधात विरोधक आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:13 IST

महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांच्या विरोधात विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी कदम यांच्या विरोधात निदर्शने केली. तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेही भाजपावर नेम साधण्याची ही संधी व दवडता कदम यांच्यावर कारवाईची मागणी करीत आंदोलन केले.

ठळक मुद्दे राष्ट्रवादीने फोडले भाजपा कार्यालयात मडके : महिला काँग्रेसची निदर्शने : शिवसेनेची राजीनाम्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांच्या विरोधात विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी कदम यांच्या विरोधात निदर्शने केली. तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेही भाजपावर नेम साधण्याची ही संधी व दवडता कदम यांच्यावर कारवाईची मागणी करीत आंदोलन केले.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वात धंतोली येथील भाजपा कार्यालयात मडके फोडून आ. राम कदम यांचा निषेध करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांनी या वेळी जोरदार नारेबाजी केली. यावेळी कांबळे म्हणाल्या, भाजपा नेते बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांनी महिला सन्मानाला ठेच पोहचविली आहे. या प्रकरणी राम कदम यांनी जाहीरपणे महिलांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनात राजेश अधव, स्मिता वासनिक, ज्योति मेश्राम, सविता शेंडे, सुनंदा पुणेकर, जोसना सिंह, इंदिरा लोखंडे, प्रमिला टेंबेकर,अर्चना कांबळे आदींचा सहभाग होता. राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष नूतन रेवतकर व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष पूनम रेवतकर यांच्या नेतृत्वातही निदर्शने करण्यात आली. या वेळी कदम यांच्या पुतळ्याला काळे फासण्यात आले. आंदोलनात संदीप मेंढे, मंजूषा सोनोने, वंदना मलिक आदी सहभागी झाले.शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांच्या नेतृत्वात फुटाळा तलाव येथे निदर्शने करण्यात आली. महिलावरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यासाठी भाजपा सरकार जबाबदार असल्याचा आरोप बडवाईक यांनी केला. राम कदम यांनी राजीनामा देण्याची मागणी करीत तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात रजनी राऊत, शालिनी सरोदे, नलिनी करंगळे, बेबी गडेकर, शेख, प्रमिला धामणे, मंदा वैरागडे, अल्का जिभंकर, ज्योती पाटील, अर्चना कापसे आदी सहभागी झाले.शिवसेनेनेही भाजपावर नेम साधण्याची संधी साधली. संविधान चौकात आंदोलन करीत कमद यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. भाजपा नेत्यांची बेताल वक्तव्ये त्यांची मानसिकता दर्शवितात, अशी टीका शिवसेना नेत्यांनी केली. आंदोलनात मंदाकिनी भावे, अल्का दलाल, सुरेखा खोब्रागडे, किशोर कुमेरिया, सूरज गोजे, राजेश कनोजिया, किशोर ठाकरे, सुनील बॅनर्जी, हितेश यादव, मनोज साहू आदींनी भाग घेतला. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमagitationआंदोलन