शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

किंमतकरांना ‘रामटेक भूषण’ देण्यास विरोध का?

By admin | Updated: November 19, 2015 03:38 IST

रामटेक नगरपालिकेच्यावतीने दिला जाणारा पहिलाच ‘रामटेक भूषण’गौरव पुरस्कार माजी मंत्री अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांना दिला जाणार आहे.

रामटेक : रामटेक नगरपालिकेच्यावतीने दिला जाणारा पहिलाच ‘रामटेक भूषण’गौरव पुरस्कार माजी मंत्री अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांना दिला जाणार आहे. माजी नगरसेवक दामोदर धोपटे यांनी नेमके किंमतकरांनी रामटेकसाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून वादाला तोंड फोडले आहे.रामटेक नगरपालिकेने नुकताच रामटेक भूषण पुरस्कार देण्याचा ठराव केला. हा पुरस्कार रामटेक शहरात जन्मलेल्या आणि विशेष कामगिरी करणाऱ्या रामटेककराला दिला जाणार आहे. पालिकेच्यावतीने हा पहिला पुरस्कार माजी मंत्री अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांना दिला जाणार आहे. रामटेक पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. या पुरस्कारासंबंधात बोलताना नगराध्यक्षा नलिनी चौधरी आणि उपाध्यक्ष रमेश कारामोेरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून रामटेक पालिकेने ‘रामटेक भूषण गौरव पुरस्कार’ देण्याचा ठराव केला. हा पुरस्कार रामटेकमध्ये जन्मलेल्या आणि विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणार आहे. रामटेक भूषण पुरस्कार दुसऱ्या कुठल्याही संस्थेला किंवा व्यक्तीला यापुढे सुरू करता येणार नाही. हा पुरस्कार दरवर्षी दिलाच पाहिजे असेही नाही. पुरस्कारयोग्य व्यक्ती मिळाल्यावरच हा पुरस्कार दिला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. हा पहिला पुरस्कार देताना निवड समितीपुढे किंमतकरांशिवाय दुसरे कुठलेही नाव नव्हते आणि या पुरस्काराला काँग्रेसच्या नगरसेवकांसह सर्वसंमतीने किंमतकरांच्या नावाची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अ‍ॅड. किंमतकरांनी रामटेक शहराच्या विकासाकरिता मंत्री असताना आणि नसतानादेखील सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला. तसेच रामटेक पालिकेला विदर्भ वैधानिक मंडळाचादेखील सर्वाधिक निधी किंमतकरांनी उपलब्ध करून दिला. राज्यात अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून किंमतकरांचे नाव आदराने घेतले जाते. रामटेकच्या ग्रामीण भागात सिंचनाची सोय व्हावी म्हणून किंमतकरांनी सिंचन योजनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले, त्यांचे अथक प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे आदिवासी भागात पाणी पोहोचले. रामटेक पालिकेने किंमतकरांना रामटेक भूषण पुरस्कार दिला म्हणजे ते मोठे होतील असे अजिबात नाही तर त्यांच्यामुळे पुरस्कार मोठा होईल. किंमतकरांनी केलेल्या कार्याला पक्षाच्या चौकटीत बांधले जाऊ शकत नाही, असे मत यावेळी नगराध्यक्षा चौधरी आणि उपाध्यक्ष कारामोरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. धोपटे यांनी केलेल्या आरोपांकडे नगराध्यक्ष चौधरी आणि उपाध्यक्ष कारामोरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की किंमतकरांची उंची काय हे सर्व महाराष्ट्र जाणतो. त्यांना पहिला रामटेक भूषण पुरस्कार देणे हा पालिकेचा आणि पुरस्कार या दोहोंचाही सन्मान आहे. पुरस्कारासाठी घातलेल्या अटी तपासून पाहिल्या तर रामटेकमध्ये जन्मलेल्या व्यक्तीलाच तो दिला जाणार आहे. किंमतकरांवर आरोप करणाऱ्या माणसाची उंची तेवढी असली पाहीजे. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपाला आणि त्या आरोप करणाऱ्या व्यक्तीला फार गंभीर घ्यायची आवश्यकता नाही. किंमतकरांवर आरोप करण्याची त्यांची पात्रता तरी आहे का?असा चिमटा त्यांनी काढला. धोपटेंचा बोलविता धनी नेमका कोण? हे धोपटेंनी स्पष्ट करावे असेही कारामोरे म्हणाले. यासंबंधात किंमतकरांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की मला कोणत्याही पुरस्काराचे अप्रुप राहिलेले नाही. मला पुरस्कार नगरपालिका देणार आहे शिवसेना नाही.(प्रतिनिधी)