शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भावी अस्थिरोगतज्ज्ञांना लंडनमध्ये संधी: दीपक हर्लेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:48 IST

पाश्चात्त्य देशात भारतीय वैद्यकीय चिकित्सकांना मानाचे स्थान आहे. यामुळे लंडनसारख्या देशात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संधी आहेत. त्या दृष्टीनेही अस्थिव्यंग शल्यचिकित्सकांनी विचार करावा, असे आवाहन नागपूरकर असलेले व गेल्या १८ वर्षांपासून लंडन येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. दीपक हर्लेकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये सांधे प्रत्यारोपणवर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाश्चात्त्य देशात भारतीय वैद्यकीय चिकित्सकांना मानाचे स्थान आहे. यामुळे लंडनसारख्या देशात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संधी आहेत. त्या दृष्टीनेही अस्थिव्यंग शल्यचिकित्सकांनी विचार करावा, असे आवाहन नागपूरकर असलेले व गेल्या १८ वर्षांपासून लंडन येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. दीपक हर्लेकर यांनी येथे केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अस्थिव्यंगरोग विभागाच्यावतीने आयोजित एकदिवसीय ‘सांधे प्रत्यारोपण’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, विभाग प्रमुख डॉ. सजल मित्रा, डॉ. उन्मेश महाजन, डॉ. अमोल कडू, डॉ. एम. फैझल, डॉ. देवाशिष बॅरिक, डॉ. मनोज पहुकर उपस्थित होते.डॉ. हर्लेकर म्हणाले, लंडनध्ये प्रत्येक डॉक्टरचेही आॅडिट होते. राजघराण्यातील व्यक्तीपासून ते सर्वसामान्य मजुरालादेखील सारखा उपचार मिळतो. तिथे मोफत उपचार प्रणाली आहे. रुग्णहिताला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना समान एक देश एक उपचारपद्धतीच्या आधारावर ही व्यवस्था सक्षम करण्यात आली आहे. डॉक्टरच्या सेवेचेही पारदर्शीपणे आॅडिट होते. जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणा ऱ्यांना अस्थिरोगाशी निगडित अद्ययावत तंत्राचे ज्ञान व्हावे, यासाठी ‘लर्न, अर्न अ‍ॅन्ड रिटर्न’ या त्रिसूत्रीनुसार प्रात्यक्षिकांवर आधारित तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते, असेही ते म्हणाले.सिकलसेलग्रस्तांना मदत होईल-डॉ. मित्राडॉ. सजल मित्रा म्हणाले, लंडनमधील अद्ययावत तंत्रज्ञान आणि येथील डॉक्टरांचे अनुभवाची सांगड घालता आली तरी सिकलसेलग्रस्तांना मदत होईल. विदर्भात सिकलसेलग्रस्तांची संख्या मोठी आहे. यात अनेकांना ‘हिप जॉर्इंट रिप्लेसमेंट’ची गरज पडते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealthआरोग्य