१४ जुलै याकूबचा डेथ वॉरंट निघाल्याचे उघड कारागृहात अचानक धावपळ वाढली. १५ जुलै याकूबचा डेथ वॉरंट नागपुरात पोहोचला. कारागृहात बंदोबस्तात मोठी वाढ.१६ जुलै महाराष्ट्रात जल्लाद नाही. मीरा बोरवणकरांचे स्पष्टीकरण,फाशी यार्डात तयारी सुरू, अधिकाऱ्यांच्या बैठका वाढल्या, घेतला सुरक्षेचा आढावा.१७ जुलै फाशीची जबाबदारी ‘टीम येरवडा’कडे, कारागृह प्रशासनाकडून साहित्याची जुळवाजुळव. १८ जुलै कारागृहात ईद साजरी. आॅपरेशन याकूबला वेग. कारागृहातील इस्पितळाची पाहणी. आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठांसोबत भेट, डॉक्टरांचे नवीन पथक नियुक्त. १९ जुलै ३० जुलैला फाशी देण्याचा अंदाजित घटनाक्रम तयार. तत्पूर्वी आणि फाशीनंतर काय करायचे, यावर कारागृह अधिकाऱ्यांची पोलीस अधिकाऱ्यांंसोबत चर्चा. २० जुलै फाशी यार्डात तयारी सुरू. २१ जुलैला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्यासुनावणीकडे साऱ्यांचे लक्षउस्मान मेमन, अॅड. अनिल गेडाम यांनी घेतली याकूबची भेट. क्युरेटीव्हवर प्रदीर्घ चर्चा.२१ जुलै सकाळी : याकूबचे दिल्लीतील वकील अॅड. शुबैल फारूख आणि उस्मान मेमनने घेतली भेट.दुपारी : सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटीव्ह पिटीशन‘ खारीज. सायंकाळी : अॅड. अनिल गेडाम कारागृहात. राज्यपालांकडे पाठविण्यासाठी याकूबने दिला कारागृह अधीक्षकांना दयेचा अर्ज. २२ जुलै सकाळी : कारागृहासमोर प्रचंड बंदोबस्तदुपारी : डीआयजी स्वाती साठे यांची कारागृहात भेट,कारागृहातील तयारीचा आढावा, कारागृहात पोहचले फाशीचे दोर,सायंकाळी : स्वाती साठेंनी सोडला नागपूर कारागृह उपमहानिरीक्षकांचा प्रभार.२३ जुलै पत्नी रहिन आणि मुलगी जुबेदासह पाच नातेवाईकांनी घेतली याकूबची कारागृहात भेट, ‘अमरधाम’वरील हालचाली वाढल्या. फाशीला स्थगिती मिळावी म्हणून माओवाद्यांचे कारागृहात उपोषण.२४ जुलै गुप्तचर यंत्रणांचा राज्य पोलीस दलाला अलर्ट, डीआयजी राजेंद्र धामने नागपुरात, कारागृहात दिवसभर पाहणी, विमानतळावर मॉकड्रील. एटीएस, एसआयडी सक्रिय.२५ जुलै ‘क्विक रिस्पॉन्स टीम’कडे कारागृहात ‘आॅपरेशन याकूब‘पर्यंत आतमधील सुरक्षेची जबाबदारी, महानिरीक्षक मीरा बोरवणकर नागपुरात.कारागृहात अधिकाऱ्यांची बैठक, फाशी यार्डात ट्रायल बघितली.याकूब प्रकरणी बोलण्यास शासनाकडून मनाई असल्याची स्पष्टोक्ती.२६ जुलै उपराजधानीत वाढला बंदोबस्त, सावधगिरीच्या सूचना, जागोजागी नाकाबंदी२७ जुलै फाशी देण्याच्या आराखड्यावर अधिकाऱ्यांची बैठक, पोलीस आयुक्तालयात बैठक, हेलिकॉप्टरने कारागृहाची टेहळणी, कारागृहाची सुरक्षाव्यवस्था वाढविली.२८ जुलै याकूबचा फोटो बाहेर आल्यामुळे खळबळ उस्मान मेमनला नाकारली याकूबची भेट, कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ लागले बॅरिकेट्स.
आॅपरेशन याकूब... ‘डेथ वॉरंट’ ते फाशी
By admin | Updated: July 30, 2015 02:46 IST