शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

नागपूरच्या सीताबर्डीतील ग्लोकल मॉलचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:50 IST

सीताबर्डीतील महात्मा गांधी रोड व अभ्यंकर रोड यांना जोडणारा १५ मीटर रुंदीचा बुटीमहाल रोड रद्द करण्याचा नागपूर सुधार प्रन्यासचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. त्यामुळे ग्लोकल मॉलचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालय : १५ मीटर रुंदीच्या रोडचा वाद संपवला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डीतील महात्मा गांधी रोड व अभ्यंकर रोड यांना जोडणारा १५ मीटर रुंदीचा बुटीमहाल रोड रद्द करण्याचा नागपूर सुधार प्रन्यासचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. त्यामुळे ग्लोकल मॉलचा मार्ग मोकळा झाला आहे.१५ सप्टेंबर २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १८ दुकानदारांची याचिका मंजूर करून बुटी महाल रोड रद्द करणे अवैध असल्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरुद्ध नागपूर सुधार प्रन्यास, जमिनीचे मूळ मालक बुटी परिवार, गोयल गंगा इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅन्ड रिअल इस्टेट कंपनी व अभ्यंकर रोडवरील दुकानदारांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण व न्या. एम. आर. शाह यांनी ती याचिका मंजूर केली. त्यामुळे ग्लोकल मॉल बांधकामापुढील सर्व अडथळे दूर झाले आहेत.गोयल गंगा इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅन्ड रिअल इस्टेट कंपनीद्वारे बुटी परिवाराच्या ८.७ एकर जागेवर ग्लोकल मॉल नावाने भव्य कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधले जात आहे. सुरुवातीला मंजूर आराखड्यामध्ये बुटी महाल रोडचा समावेश होता. त्यानंतर नासुप्रने सुधारित आराखडा मंजूर केला. त्यामधून हा रोड वगळण्यात आला. परिणामी १८ दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.सीताबर्डीचे चित्र बदलेलग्लोकल मॉलमुळे सीताबर्डीचे चित्र बदलणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हा प्रकल्प अडचणीत आला होता. नासुप्रने १५ मे २०१२ रोजी या जमिनीवरील ले-आऊट आराखडा मंजूर केला. २७ जून २०१२ रोजी बिल्डिंग परमिट दिले तर, ११ डिसेंबर २०१४ रोजी सुधारित इमारत आराखड्याला मान्यता दिली. सुधारित आराखड्यात १५ मीटर रुंद अंतर्गत रोडचा समावेश नाही. हा रोड रद्द करण्याची कृती योजनेतील तरतुदीच्या आणि सर्वोच्च न्यायालयाद्वारे कायदेशीर ठरविण्यात आलेल्या ८ एप्रिल २००२ रोजीच्या तडजोडीमधील अटींच्या विरोधात आहे असे उच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले होते. तसेच, अंतर्गत रोड रद्द केल्यामुळे योजनेचा मूळ उद्देशच नष्ट झाल्याचे मत व्यक्त केले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केल्यामुळे ग्लोकल मॉलचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSitabuldi square Nagpurसीताबर्डी चौक