नागपुरात इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 09:59 PM2020-06-30T21:59:28+5:302020-06-30T22:02:40+5:30

नागपूर शहरात ४० नव्या इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी परिवहन समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता मनपाच्या परिवहन सेवेमध्ये ४० नव्या इलेक्ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहेत.

Open the way for electric bus transport in Nagpur | नागपुरात इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा

नागपुरात इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्दे४० बस होणार मनपाच्या परिवहन सेवेत दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात ४० नव्या इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी परिवहन समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता मनपाच्या परिवहन सेवेमध्ये ४० नव्या इलेक्ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहेत.
मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात परिवहन समितीची बैठक घेण्यात आली. समिती सभापती बाल्या बोरकर, सदस्य नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, विशाखा बांते, मनीषा धावडे, वैशाली रोहणकर, रूपाली ठाकूर, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे आदी उपस्थित होते.
या ४० बसेसकरिता निविदा मागविण्यात आली होती. यामध्ये मे. ई.व्­ही.ई.वाय. ट्रान्सपोर्ट प्रा.लि. या कंपनीद्वारे प्रति किलोमीटर ७२ रुपये ९९ पैसे एवढा दर देण्यात आला. मात्र यावर मनपा आयुक्तांची कंपनीच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर ६६ रुपये ३३ पैसे प्रति किमी दर निश्चित करण्यात आला आहे. या बसेसकरिता प्रति बस ४५ लाख रुपये केंद्र शासनाकडून मिळणार आहे. मनपाला केवळ ६६ रुपये ३३ पैसे प्रति किमी एवढ्याच दराची भरपाई करावी लागणार आहे. या बसमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना किमान वेतन नियमानुसार वेतन देण्याचे निर्देश बाल्या बोरकर यांनी दिले आहे. केंद्र शासनाकडून तातडीने करार करण्याबाबत निर्देश बैठकीत प्राप्त मंजुरीअन्वये यथाशीघ्र करारनामा करण्यात येईल, असे सांगितले.

पर्यावरण संवर्धनाला मदत
या ४० इलेक्ट्रिक बसेसमुळे मनपाच्या परिवहन विभागाला अधिक गती प्राप्त होणार आहे. पर्यावरण संवर्धनाला मदत होणार आहे. बसेसमुळे नागरिकांना सुविधा मिळणार असल्याचे मत बाल्या बोरकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Open the way for electric bus transport in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.