शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अध्ययन, अध्यापन अहवालाची माहिती भरणारी वेबसाईटच असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:15 IST

शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू आहे, हे दर्शविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्याचा साप्ताहिक अहवाल ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. असे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून देण्यात आले आहे. ऑनलाईन अहवाल भरण्यासाठी जी वेबसाईट दिली आहे, तीच सुरक्षित नसल्याची ओरड शिक्षकांची आहे.

ठळक मुद्देमाहिती हॅक होण्याची भीती : डोळे मिटून माहिती भरू नका, शिक्षकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू आहे, हे दर्शविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्याचा साप्ताहिक अहवाल ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. असे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कडून देण्यात आले आहे. ऑनलाईन अहवाल भरण्यासाठी जी वेबसाईट दिली आहे, तीच सुरक्षित नसल्याची ओरड शिक्षकांची आहे. त्यामुळे शिक्षकांनी भरलेला माहिती हॅक होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.सध्यस्थितीत राज्यात शाळा बंद असल्या तरी विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ज्या विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने उपलब्ध नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन व शिक्षक मित्र उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू ठेवले आहे. शिक्षक करीत असलेल्या या प्रयत्नांची, उपक्रमांची माहिती राज्य शासनास, केंद्र शासनास व इतर राज्यांना व्हावी याकरिता शिक्षण परिषदेने दिलेल्या या http://covid19.scertmaha.ac.in/Teacher.aspxलिंकवर शिक्षकांना माहिती भरायची आहे. ही माहिती शिक्षकनिहाय, शाळानिहाय, केंद्रनिहाय, तालुकानिहाय व जिल्हानिहाय आठवड्यातून एकदा भरायची असून त्याकरिता प्रत्येक शिक्षकांनी पोर्टलवर आपली नोंदणी करायची आहे. नोंदणीसाठी शिक्षकांना आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे.पण ही वेबसाईटच असुरक्षित असल्याचा शिक्षकांचा दावा आहे. यासंदर्भात प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष हेमंत गांजरे यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या वेबसाईटच्या नावाच्या अगोदर कुलुपाचे चिन्ह असते, तेव्हा ती वेबसाईट सुरक्षित समजल्या जाते. ही वेबसाईट उघडल्यावर स्वत: ती सुरक्षित नसल्याचे म्हणजे ‘नॉट सिक्युअर्ड’ असल्याचे दाखवित आहे.या वेबसाईटवर वैयक्तिक माहिती तसेच विषयाची माहिती भरावयाची आहे. शिक्षण विभागाची ही वेबसाईट कधीही हॅक होऊ शकते. यापूर्वी अशा अनेक वेबसाईट हॅक केलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी सावधान होऊन, डोळे बंद करून आपली माहिती भरू नये.हेमंत गांजरे, कार्याध्यक्ष, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन