शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तापमान ४४ अंंशावर उष्माघाताचे रुग्ण केवळ दोन

By सुमेध वाघमार | Updated: May 28, 2024 21:29 IST

-मेयोत उपचार : आतापर्यंत सहा संशयितांचा मृत्यू

नागपूर: नागपूरचे दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. असे असताना उष्माघाताचा रुग्णांची नोंद घ्यायला कोणी तयार नसल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) केवळ दोन रुग्णांची नोंद झाली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मंगळवारी नागूपरचे तापमान वाढून ४४.८ अंश सेल्सिअसवर पोहचले. तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका होतो. मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ झाल्याने उष्माघाताची शक्यता वाढली आहे. मात्र मेयो सोडल्यास मेडिकल व महानगरपालिकेच्या शितकक्षात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. मेयोमध्ये भरती असलेल्या दोन रुग्णामध्ये एक १७ वर्षीय तर दुसरे ५० वर्षीय पुरुष आहे. मागील २४ तासांत हे रुग्ण भरती झाल्याचे सांगण्यात येते. सध्या मेयोमध्ये १५ बेडचे शीतकक्ष स्थापन केले आहे. 

- कामाशिवाय उन्हात निघणे टाळा डॉक्टरांनुसार, कामाशिवाय उन्हात निघणे टाळायला हवे. भरपूर पाणी प्यायला हवे. सैल कपडे वापरावीत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा टोपीचा वापर करावा. प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी. दुपारी उन्हात शारिरीक श्रमाची कामे करू नये. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक आदी पेय प्यायला हवे. घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करण्याचे आवाहनही मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे. 

-संशयित मृत्यूचे कधी होणार ‘आॅडिट’मे महिना संपायला आला तरी संशयित मृत्यूचे ‘आॅडिट’ झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागूपर शहरात मागील २२ दिवसांत सहा अनोळखी व्यक्ती बेशुद्धा अवस्थेत सापडले. त्यांना, मेयो व मेडिकलमध्ये दाखल केले असताना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. हा उष्माघाताचा मृत्यू आहे का, हे तपासण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ समिती आहे. परंतु अद्यापही या समितीची बैठक झालेली नाही.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातnagpurनागपूर