शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींसाठी नागपुरातील महत्त्वकांशी एम्स रखडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:25 IST

आयुर्विज्ञान संस्थेकरिता (एम्स) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे २०१८ ते २० या शैक्षणिक वर्षाकरिता एमबीबीएस प्रवेश सुरू करण्यास पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनने (पीएमएसएसवाय) मंजुरी मिळून सहा महिन्यावर कालावधी होत आहे. मात्र ‘एम्स’चे वर्ग सुरू करण्यास आवश्यक बांधकामासाठी लागणारा दोन कोटीचा निधी अद्यापही उपलब्ध झालेला नाही.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीने केले हात वर : ‘एम्स’च्या वर्गाच्या बांधकामासाठी निधीच नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : आयुर्विज्ञान संस्थेकरिता (एम्स) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे २०१८ ते २० या शैक्षणिक वर्षाकरिता एमबीबीएस प्रवेश सुरू करण्यास पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनने (पीएमएसएसवाय) मंजुरी मिळून सहा महिन्यावर कालावधी होत आहे. मात्र ‘एम्स’चे वर्ग सुरू करण्यास आवश्यक बांधकामासाठी लागणारा दोन कोटीचा निधी अद्यापही उपलब्ध झालेला नाही. विशेष म्हणजे, कालपर्यंत हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. तसा प्रस्तावही मेडिकल प्रशासनाने पाठविला होता. परंतु सूत्रानुसार, जिल्हा नियोजन समितीने ‘एम्स’साठी हा निधी देता येत नाही, असे सांगून हात वर केल्याने राज्य शासनाचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ रखडण्याची शक्यता आहे.मिहानमध्ये २५२ एकरमध्ये तयार होणाऱ्या ‘एम्स’ची सुरक्षा भिंत उभी झाली आहे. लवकरच प्रस्तावित बांधकामाला सुरुवात होणार आहे. ‘एम्स’ला आवश्यक असणाऱ्या ‘एमबीबीएस’च्या ५० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाने मान्यता दिली असली तरी ‘पीएमएसएसवाय’च्या मंजुरीची प्रतीक्षा होती. सहा महिन्यापूर्वी ही प्रतीक्षाही संपली. तसे पत्र प्राप्त होताच वैद्यकीय शिक्षण विभागाने मेडिकलला पुढील कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ‘एम्स’च्या शैक्षणिक सत्रासाठी मेडिकल कॉलेजची एक ‘विंग’ स्वतंत्र करण्यात येणार होती. यासाठी दोन कोटी रुपयांची आवश्यकता होती. वैद्यकीय शिक्षण विभागाने एवढा निधी नसल्याचे स्पष्ट केले. तर मेडिकल प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी उपलब्ध होऊ शकतो का, त्यादृष्टीने प्रयत्न केले. सूत्रानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु आता जिल्हा नियोजन समितीचा निधी अशा कामांवर खर्च करण्याची कुठलीही तरतूद नसल्याचे तोंडी उत्तर आल्याने, हा प्रकल्प अडचणीत आला आहे. निधी उपलब्ध करून देण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात येत असल्याची माहिती आहे. यावर खर्च होणार होता हा निधी‘एम्स’च्या प्राध्यापकांच्या राहण्याकरिता पाच बंगले, १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले तीन वातानुकूलित लेक्चर हॉल, प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरिता तीन प्रयोगशाळा आणि द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांकरिता पाच प्रयोगशाळा, याशिवाय डिजिटल लायब्ररी, वाय-फाय आणि इतर आवश्यक सोयीसह संचालकांचे कार्यालय व ३५ अध्यापक व कर्मचारी वर्गाकरिता राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, निधीअभावी २०१८ वर्षाला सुरुवात होऊनही बांधकामाला सुरुवात झालेली नाही.मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठविला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘एम्स’ला प्राधान्य देण्यात आल्यामुळेच यावर्षीपासून एम्सचे शैक्षणिक वर्ग सुरू होत आहेत. या वर्गाच्या व कार्यालयीन बांधकामासाठी लागणारा दोन कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव नुकताच मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे.-डॉ. वीरल कामदार

टॅग्स :Healthआरोग्यeducationशैक्षणिक