शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

जनतेचे प्रश्न सोडवा, तरच काँग्रेस बळकट होईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 11:55 PM

Congress foundation day, nagpur news काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाला मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या समस्या समजून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावे, असे आवाहन पक्षाच्या स्थापना दिनी करण्यात आले. तसेच नागपूर काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी निमित्त पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक वरिष्ठ काँग्रेसींच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करतील, असा निर्णयसुद्धा यावेळी घेण्यात आला.

ठळक मुद्देकाँग्रेसचा स्थापना दिवस : घरोघरी जाऊन होणार ज्येष्ठ काँग्रेसींचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाला मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या समस्या समजून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावे, असे आवाहन पक्षाच्या स्थापना दिनी करण्यात आले. तसेच नागपूर काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी निमित्त पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक वरिष्ठ काँग्रेसींच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करतील, असा निर्णयसुद्धा यावेळी घेण्यात आला.

काँग्रेसचा स्थापना दिनानिमत्त शहर व ग्रामीण काँग्रेस कार्यालयात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शहर काँग्रेसतर्फे महाकाळ सभागृहात तर ग्रामीण काँग्रेसतर्फे ग्रामीणच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे म्हणाले, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना पद देतो. नागरिकांच्या समस्या सोडवल्या तरच पक्ष मजबूत होईल. पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट समजून घेतली आणि कामाला लागले तर पुढचा महापौर काँग्रेसचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाकाळकर सभाागृहात आयोजित या कार्यक्रमात किशोर गजभिये, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोढे, अतुल कोटेचा, हुकुमचंद आमदरे, नगरसेवक संजय महाकालकर, प्रशात धवड, संदीप सहारे, रश्मी धुर्वे, बंडोपंत टेंभुर्णे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, इरशाद अली, किशोर पाटील, अ‍ॅड. नंदा पराते, घनश्याम मांगे आदी उपस्थित होते. संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले. तर सुनील पाटील याांनी आभार मानले.

ग्रामीणतर्फे गणेशपेठ येथील जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात केक कापून पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. काँग्रेस ही एक शक्ती आहे. ही शक्ती सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी वारण्याचे आवाहन माजी मंत्री व ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केले. तर, काँग्रेस हा एक विचार असून या विचाराने नेहमीच देशाला बळकटी दिली असल्याचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे यांनी सांगितले. यावेळी किशोर गजभिये , एस.क्यू. जामा, राहुल सिरिया, राहुल घरडे , उदयसिंग यादव, कुंदा राऊत, कामठीचे नगराध्यक्ष शहाजहां शफाअत अहमद, वसंत गाडगे, दुधराम सव्वालाखे, कैलास राऊत, सुनीता ठाकरे, वंदना बालपांडे, रमेश जोध, दामोधर धोपटे, अहफाज अहमद, जयंत दळवी, रमेश दुबे, मतीन खान, मुस्ताक अहमद, कला ठाकरे, प्रियंका निकोसे, मंदा चिमनकर, केतन रेवतकर, रितेश राऊत, सुरय्या बेगम आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :congressकाँग्रेसVikas Thakreविकास ठाकरे