शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमध्ये केवळ अधिकृत फेरीवालेच व्यवसाय करतील; हायकोर्टाचे आदेश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 4, 2024 20:08 IST

महानगरपालिकेला मागितली यादी.

नागपूर : चंद्रपूरमध्ये केवळ अधिकृत फेरीवाल्यांनाच व्यवसाय करण्याची परवानगी द्या. इतर फेरीवाले रोडवर व्यवसाय करणार नाही, हे सुनिश्चित करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला दिले आहेत. तसेच, येत्या १२ जूनपर्यंत अधिकृत फेरीवाल्यांची यादी न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.

चंद्रपूरमधील फेरीवाल्यांना नियंत्रित करण्यासाठी रघुवंशी व्यापार संकुल संघटना व इतरांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, महानगरपालिकेचे वकील ॲड. महेश धात्रक यांनी जैन चित्रपटगृह व न्यू इंग्लिश हायस्कूलजवळ फेरीवाल्यांना रोडच्या एका बाजूने रविवार बाजार भरविण्याची परवागी देण्यात आली आहे, अशी माहिती दिली व ही व्यवस्था शहर फेरीवाला समिती कार्यान्वित होतपर्यंत कायम राहील, याकडे लक्ष वेधले. न्यायालयाने हे मुद्दे रेकॉर्डवर घेऊन या ठिकाणी केवळ अधिकृत फेरीवाल्यांनाच व्यवसाय करता येईल, असे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. हरीश ठाकूर यांनी कामकाज पाहिले.

फेरीवाला प्रतिनिधी निवडणूक मेपर्यंतशहर फेरीवाला समितीमध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. ही निवडणूक प्रक्रिया तातडीने पूर्ण करा व येत्या ३१ मेपर्यंत फेरीवाला प्रतिनिधींची नावे समितीला सादर करा, असे निर्देश न्यायालयाने सहायक कामगार आयुक्तांना दिले. तसेच, ही नावे मिळाल्यानंतर समिती तातडीने कार्यान्वित करा, असे महानगरपालिकेला सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर