शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदाराच्या अंगठ्यानेच द्या धान्य वितरणास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 22:16 IST

राज्यासह जिल्ह्यातही कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुुळे शासनाने दुकानदारांसोबतच शिधापत्रिकाधारकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे, कोरोना संपेपर्यंत दुकानदारांच्या अंगठ्यांनी धान्य वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी विदर्भ रास्त भाव दुकानदार/केरोसीन विक्रेता संघटनेने शासनाकडे केली आहे.

ठळक मुद्देशासनाने थांबवावा जीवघेणा खेळ : रेशन दुकानदार संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यासह जिल्ह्यातही कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुुळे शासनाने दुकानदारांसोबतच शिधापत्रिकाधारकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे, कोरोना संपेपर्यंत दुकानदारांच्या अंगठ्यांनी धान्य वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी विदर्भ रास्त भाव दुकानदार/केरोसीन विक्रेता संघटनेने शासनाकडे केली आहे.शासनाला पाठविलेल्या निवेदनात संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, पुरवठा विभागाने ऑगस्ट २०२० पासून सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांच्या ई-पॉस मशीनवर अंगठे प्रमाणित करून धान्य वाटप करण्याचे आदेश देऊन कार्डधारक व दुकानदारांच्या आरोग्याशी खेळ सुरू केलेला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असून, सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांसोबतच दुकानदारही बळी पडत आहेत. नागपूर शहरात आजवर तीन रेशन दुकानदारांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर १४० वर दुकानदार बाधित झालेले आहेत. अशा परिस्थीतीत त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था आहे, याची साधी दखलसुदा शासनाने घेतलेली नाही. कोरोनामुळे जनता व दुकानदार बाधित झाले तरी शासनाला काही फरक पडत नाही, असे दिसून येत आहे. या कारणामुळे राज्य फेडरेशन ने ई-पॉस मशीनवर कार्डधारकांचे अंगठे प्रमाणित करणे त्वरित बंद करून दुकानदारांंचे अंगठे प्रमाणित करून धान्य वितरण करावे, या मागणीसाठी गत १ सप्टेंबरपासून धान्याचे वितरण बंद केलेले आहे. त्याचप्रमाणे रास्तभाव दुकानदार धान्य वितरण करीत नाही, याचीही शासनाने दखल घ्यावी. मृत दुकानदारांच्या कुटुंबाला विमा सुरक्षा म्हणून मदत करावी, अशी मागणीही संजय पाटील यांच्यासह सुभाष मुसळे, गुड्डू अग्रवाल, रितेश अग्रवाल, प्रफुल्ल भुरा, मिलिंद सोनटक्के, राजेश कांबळे, रूपेश सावरकर, शंकर भोयर, प्रेम टिक्कस, सुनील जैस आदींनी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर