शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सापांच्या फक्त ६९ जाती विषारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:03 IST

श्रावणपंचमी अर्थात नागपंचमी अर्थात सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव म्हणून आपण हा सण साजरा करतो. साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जेवढी भीती, आकर्षण, जिज्ञासा आपल्या मनात असते तेवढेच अज्ञानही आहे. जगात सापाच्या तब्बल ३ हजार ७५जाती असून, भारतात त्यातील सुमारे २८२ प्रकारचे साप आढळतात व त्यात ६९ साप हे विषारी असतात. त्यातील पाच-सहा जातीचे साप जास्त प्रमाणात आढळतात.

ठळक मुद्देभारतात आढळतात २८२ प्रकारचे सापनागपंचमी विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : श्रावणपंचमी अर्थात नागपंचमी अर्थात सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव म्हणून आपण हा सण साजरा करतो. साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जेवढी भीती, आकर्षण, जिज्ञासा आपल्या मनात असते तेवढेच अज्ञानही आहे. जगात सापाच्या तब्बल ३ हजार ७५जाती असून, भारतात त्यातील सुमारे २८२ प्रकारचे साप आढळतात व त्यात ६९ साप हे विषारी असतात. त्यातील पाच-सहा जातीचे साप जास्त प्रमाणात आढळतात.सापांचे प्रकार अनेक आहेत. त्यात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे. विषारी सापांमध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे व काही समुद्री सापांचा समावेश आहे. एकूण विषारी सर्पदंशांपैकी निम्म्याहून अधिक दंश नाग व मण्यार यांचेच असतात. त्याखालोखाल फुरसे, घोणस यांचा नंबर लागतो. नाग व मण्यार यांचे विष मुख्यत: मज्जासंस्थेस तर फुरसे, घोणस यांचे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस घातक असते. विषारी सापाच्या अगदी अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलांनाही थोडे का होईना विष असते.सापांना वाचवाअन्नधान्याची नासाडी करणाºया उंदरांची संख्या जगातील मानवी लोकसंख्येच्या चौपट आहे. उंदरांच्या मलमूत्रातून लेप्टोस्पायरोसिससारखे घातक रोग होतात. उंदरांचा बंदोबस्त फक्त सापच करू शकतात. त्यामुळे सापांची हत्या करू नका, असे आवाहन सर्पमित्र स्वप्नील बोधाने यांनी केले आहे. बोधाने यांनी सांगितले, नागपंचमीनिमित्त आजही अनेक भागांत गारुडी हे टोपलीमध्ये साप व नाग घेऊन घरोघर हिंडताना दिसतात. बरेचसे भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा करून त्यांना दूध प्यायला देतात. मात्र दूध हे सापाचे अन्न नसून उंदीर, बेडूक यासारखे प्राणी त्यांचे मुख्य अन्न आहे. गारुड्यांजवळ असलेल्या सापांचे ‘विषदंत’ म्हणजे दात काढून टाकलेले असतात. या सापांना सात ते आठ दिवसांपासून अन्नपाण्याविना उपाशीच ठेवलेले असते. त्यामुळे जेव्हा भाविक त्या सापाला दूध पाजतात तेव्हा उपाशी साप नाईलाजाने दूध प्राशन करतो व नंतर काही दिवसांनी मृत्युमुखी पडतो.विषारी-बिनविषारी सापाच्या खुणाबिनविषारी साप चावल्यास१. चावलेल्या दातांच्या खुणा बऱ्याच व रांगेत दिसतात.२. चावलेल्या जागेतून द्रव जास्त वाहात नाही.३. चावलेली जागा काळी-निळी होत नाही.४. चावलेल्या जागी खूप सूज येत नाही.विषारी साप चावल्यास१. एक-दोन दातांच्याच खुणा दिसतात.२. चावलेल्या जागेतून द्रव किंवा रक्त वाहते.३. चावलेली जागा काळी-निळी होते.४. चावलेल्या जागी खूप सूज येते.५. फुरसे किंवा घोणस चावला तर त्या जागी फार सूज येते व ती वाढत जाते. या सापाच्या विषामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. मूत्रपिंडावरही परिणाम होतो.६ नाग किंवा मण्यार चावल्यास त्या जागी सूज येते. दहा मिनिटांतच डोळ्यांवर झापड यायला सुरुवात होते व श्वासोच्छवासाला त्रास सुरू होतो. बोलायला, गिळायला, हालचाल करायला त्रास होऊ लागतो. तोंडातून लाळ गळायला लागते.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक