शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येची केवळ ५३ टक्केच प्रकरणे मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 20:42 IST

अमरावती विभागात २०१३ सालापासून पावणेसहा हजाराहून अधिक आत्महत्या झाल्या. मात्र यातील ५४ टक्के शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली व प्रत्यक्षात ५३ टक्केच कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष मदत मिळू शकली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देअमरावती विभागातील वास्तव : इतरांच्या कुटुंबीयांचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती विभागात २०१३ सालापासून पावणेसहा हजाराहून अधिक आत्महत्या झाल्या. मात्र यातील ५४ टक्के शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली व प्रत्यक्षात ५३ टक्केच कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष मदत मिळू शकली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकाराअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. २०१३ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत अमरावती विभागात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत अमरावती विभागात ५ हजार ९४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी मदतीसाठी प्राप्त झाले. यातील ३ हजार २२८ म्हणजेच ५४.३२ टक्के प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. यातील १८२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असून आतापर्यंत ३ हजार २०७ कुटुंबीयांनाच (५३.९७ टक्के) प्रत्यक्ष मदत मिळू शकली आहे. अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांचा समावेश होतो.यवतमाळमध्ये सर्वाधिक अपात्र प्रकरणेयवतमाळ जिल्ह्यात सहा वर्षांच्या कालावधीत १ हजार ६५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ८१४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. त्यातही ३५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असून ८११ (४८.९४ टक्के) प्रकरणांतच प्रत्यक्ष मदत झाली. येथे तब्बल ५१.०६ टक्के प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली. अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी ४१.२१ टक्के प्रकरणे अपात्र ठरली.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता