शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Maharashtra Election 2019; नागपुरात ५७ वर्षांत केवळ ६ टक्के महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 3:15 PM

मागील ५७ वर्षात नागपुरातून हजाराहून उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढविली. यातील महिला उमेदवारांची संख्या ही केवळ ६३ इतकी ठरली.

ठळक मुद्देमहिला उमेदवारांना कधी मिळणार संधी राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांची उदासीनताच

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासिनता आहे. मागील ५७ वर्षात नागपुरातून हजाराहून उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढविली. यातील महिला उमेदवारांची संख्या ही केवळ ६३ इतकी ठरली. यातही डॉ.सुशिला बलराज व दमयंतीबाई देशभ्रतार वगळता एकाही महिला उमेदवाराला विधानसभेत पोहोचण्यात यश आले नाही.१९६२ ते २०१४ या कालावधीत नागपुरने एकूण १२ निवडणूका पाहिल्या व आता १३ व्या निवडणूकीला शहर सामोरे जात आहे. २०१९ पर्यंतच्या उमेदवारांची संख्या ही १ हजार २७ इतकी ठरली. यातील महिला उमेदवारांची संख्या ही केवळ ६३ म्हणजेच ६.१३ टक्के इतकीच ठरली आहे.१९६२, १९६७ व १९७२ साली लढण्यात आलेल्या पहिल्या तीन निवडणूकांत कॉंग्रेसने डॉ.सुशीला बलराज यांनाच तिकीट दिले होते व मतदारांनीदेखील महिलाशक्तीवर विश्वास टाकला.१९६२ साली नागपूर व त्यानंतर सलग दोनदा पश्चिम नागपूर मतदारसंघातून त्या निवडून गेल्या होत्या. १९७८ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकडून त्या उभ्या झाल्या, मात्र विजयी चौकार मारण्याची त्यांची संधी हुकली.त्यानंतर कॉंग्रेसने १९८५ साली उत्तर नागपुरातून दमयंतीबाई देशभ्रतार यांना तिकीट दिले. आश्चर्याची बाब म्हणजे प्रथमच उत्तर नागपुरात कॉंग्रेसला विजय मिळाला होता. या चार निवडणूका वगळता नागपुरातून एकदाही महिला उमेदवाराला विजय मिळविता आला नाही.जनसंघाकडून पहिल्याच निवडणूकीपासून सुमतीताई सुकळीकर यांनी किल्ला लढविला होता. मर्यादित मनुष्यबळातदेखील त्यांनी सलग चार वेळा निवडणूक लढविली.यात १९६२ साली नागपूर मतदारसंघ व त्यानंतर १९६७, १९७२ व १९७८ (जनता पार्टी)मध्ये नागपूर पश्चिममधून त्या उभ्या राहिल्या. परंतु चारही वेळा त्यांना विजयश्रीने हुलकावणीच दिली. त्यानंतर भाजपची स्थापना झाली व भाजपने एकाही महिला उमेदवाराला शहरातून आजपर्यंत तिकीट दिलेले नाही.सर्वाधिक उमेदवारी पश्चिम नागपुरातून१९६२ साली नागपूर, नागपूर-१, नागपूर-२, नागपूर-३ असे मतदारसंघ होते. १९६७ साली मतदारसंघांना नावे मिळाली. त्यामुळे १९६७ पासूनच्या आकडेवारीकडे लक्ष टाकले असता पश्चिम नागपुरात आतापर्यंत २१ महिला उमेदवारांनी आव्हान दिले. तर उत्तर नागपुरातून २० महिला उमेदवार उभ्या झाल्या. दक्षिण नागपूर (७), मध्य नागपूर (८), दक्षिण-पश्चिम नागपूर (३) व पूर्व नागपूर (१) अशी आकडेवारी राहिली आहे.सर्वाधिक आव्हान अपक्ष स्वरुपातराष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी हव्या त्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिली नसल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसने चार वेळा महिलांना उमेदवारी दिली. तर जनसंघाने तीनदा महिलांवर विश्वास टाकला होता. जनता पार्टीने एकदा उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व बसपने दोन महिलांना आतापर्यंत संधी दिली आहे. ३५ अपक्ष महिलांनी आव्हान उभे केले तर इतर पक्षांनी १७ महिलांना उमेदवारी दिली.

 

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019