शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर वगळता विभागात ४० टक्केच कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 11:51 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. तेव्हा प्रत्येकास कर्ज मिळेल, असा दावा केला जात असताना राष्ट्रीयीकृत बँका मात्र माफीच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत उदासीन आहेत.

ठळक मुद्देआदेशाचे पालन नाही राष्ट्रीयीकृत बँकांची उदासीनता चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. तेव्हा प्रत्येकास कर्ज मिळेल, असा दावा केला जात असताना राष्ट्रीयीकृत बँका मात्र माफीच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत उदासीन आहेत. नागपूर विभागात नागपूर व वर्धा जिल्हा सोडला तर राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज वाटपाची टक्केवारी ४० टक्केही नाही. त्यामुळे कर्ज वाटपाचा नेमका फायदा कुणाला झाला, असा प्रश्न विचारला जात आहे.मागील वर्षी खरीप हंगामाच्या वेळी शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात २०१७ पूर्वीच्या पाच वर्षांतील थकबाकीदारांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर याची मर्यादा वाढवून २००१ पासूनचे थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. पहिल्या टप्प्यातच ७० लाखांच्यावर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून, यामुळे शासनावर ३४ हजार कोटींचा भार येण्याचा दावा शासनाकडून करण्यात आला होता. नागपूर विभागात पाच लाखावर शेतकऱ्यांना माफीचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात सप्टेंबरपर्यंत अडीच लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांना फायदा झाला. शासनाने आॅगस्ट २०१७ पर्यंतचे कर्ज आणि व्याजाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ होण्यास विलंब झाला. त्यावरील व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत आहे. व्याजाच्या रकमेपोटी शेतकरी बँकेच्या दरबारी कर्जदार आहे. शासनाने व्याजाची रक्कम सोडण्याचे आवाहन केले असून, तसे आदेशही दिले आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँका शासनाचे आदेश पाळण्यास तयार नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाही. नागपूर विभागात राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्ज वाटपाचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. नागपूर जिल्हा वगळता इतर पाच जिल्ह्याचे सरासरी कर्ज वाटप ४० टक्क्याच्याच घरात आहे. बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी